Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

उद्यापासून दिवाळीनिमित्त १६० जादा बसेस धावणार

Share
विद्यार्थ्यांसाठी वेळांचे रास्त नियोजन करा; अनिल परब यांची एसटी महामंडळाला सूचना; MSRTC : Need to make planning for students travell - Anil Parab

नाशिक : दिवाळीमुळे होणार्‍या गर्दीसाठी एसटी महामंडळाने ज्यादा बस सोडण्याचा निर्णय घेतला असून, एकूण १६० जादा बसेसचे नियोजन विभागातंर्गत करण्यात आले आहे. उद्यापासून या जादा बस सोडण्यात येणार आहे.

दरम्यान दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली असून एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. सर्वाधिक बस या नाशिक-पुणे मार्गावर वाढविण्यात आल्या आहेत. उद्यापासून (दि. २४) ऑक्टोंबरपासून १३ डेपोंच्या बसस्थानकांवरून लांब आणि मध्यम पल्ल्यांच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. जादा फेर्‍या दिवाळी हंगामात ३ नोव्हेंबरपर्यत सुरू राहणार आहेत. तसेच प्रवाशांची ऐनवेेळी धावपळ होवू नये, यासाठी एसटीने ऑनलाइन आरक्षणाची सुविधा सुरू केली आहे.

शालेय, महाविद्यालयीन परीक्षेचा कालावधी संपला असून विद्यार्थ्यांनाही दिवाळीच्या सुट्या २१ तारखेपासून लागल्या आहेत. त्याचबरोबर दिवाळीसाठी नागरिकांनी गावी जाण्यासाठी धावपळ तर दिवाळीनंतर भाऊबिजेसाठी महिलांचीही माहेरी जाण्याची लगबग अधिक असते. या कालावधीत एसटीच्या गाड्यांना जादा प्रवाशी मिळतात. त्यामुळे एसटीने दिवाळी हंगामासाठी यंदा सुमारे १२ दिवस लांब आणि मध्यम पल्ल्यांच्या अंतरासाठी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडणार आहे.

दिवाळीनिमित्त होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी एसटी महामंडळ दररोज १६० जादा बस सोडणार आहेत. २४ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक आगारातून या बसेस सोडण्यात येणार आहेत. यासोबत प्रवाशांसाठी अजून एक दिलासादायक गोष्ट म्हणजे दिवाळीनिमित्त महामंडळाने कोणतीही दरवाढ केली नाही. दिवाळीच्या काळात एसटी महामंडळाने ‘प्रवासी मित्र’ नावाची एक संकल्पना सुरु केली आहे. प्रत्येक आगारात, बस स्थानकात प्रवाशांच्या मदतीसाठी हे प्रवासी मित्र उपलब्ध असणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!