नाशिक विभागातील सर्व अभयारण्ये पुढील आदेश येईपर्यंत पर्यटकांसाठी बंद

नाशिक विभागातील सर्व अभयारण्ये पुढील आदेश येईपर्यंत पर्यटकांसाठी बंद

नाशिक | जागतिक आरोग्य संघटना (WHO) कोरोना विषाणू कोविड-19 ही जागतिक साथ घोषित केल्याचे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी याबाबत केलेले अभिप्राय लक्षात घेता आणि मुख्य वन्यजीवररक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मुंबई यांचेकडील निर्देशनुसार नाशिक विभागातील अभयारण्य 1 मे 2020 ते पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत, अशी माहिती वनसंरक्षक (वन्यजीव) अ. मो. अंजनकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

नाशिक विभागातील कळसुबाई, हरिश्चंदग्रड वन्यजीव अभयारण्य (जि.अहमदनगर), नांदुर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्य जि.नाशिक, अनेरडॅम वन्यजीव अभयारण्य जि.धुळे व यावल वन्यजीव अभयारण्य जि.जळगांव या अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या ग्रामस्थ व पर्यटकांची सुरक्षा व आरोग्याच्या दृष्टीने ही अभयारण्ये 1 मे 2020 ते पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद राहतील.

वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी त्यांच्या वनपरिक्षेत्रातील परिमंडळ तसेच नेमणुकीच्या क्षेत्रात कर्मचारी उपस्थित राहतील. तसेच या दरम्यान पर्यटकांना अभयारण्यात प्रवेश बंद करावा, याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पर्यटकांना आवाहन करावे असेही अंजनकर म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com