जिल्ह्यात पावसाची हजेरी

0
नाशिक । दि.13 देशदूत चमू- दिवसभराच्या उकाड्यानंतर दुपारच्या वेळी शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. निफाड तालु्क्यात पिंपळगाव, नांदूरमध्यमेश्वर, चांदोरी, नैताळे आदी गावांत पाऊस झाला. गोदाकाठ परिसरात गारांचा पाऊस पडल्याने अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले.

दिंडोरी तालु्नयातील तिसगाव बहादुरी येथे गारा पडल्या तर लखमापूर, वरखेडा, चिंचखेड, लोखंडेवाडी, बोपेगाव, पालखेड, म्हेळुस्के, जानोरी, मोहाडी, कादवा, म्हाळुंगी, पाडे, हातनोरे, निळवंडी, उमराळे, ओझे, करंजवण येथे जोरदार पाऊस झाला. सिन्नर तालु्नयात सुसाट्याच्या वार्‍यामुळे अनेक ठिकाणी घरावरचे पत्रे उडून गेले होते. या पावसामुळे शेतकर्‍यांचा उघड्यावर ठेवलेला कांदा, तसेच द्राक्ष व गव्हाचे नुकसान झाले.

LEAVE A REPLY

*