Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्हा मजूर संघ : संभाजी पवार अध्यक्ष तर शशिकांत आव्हाड उपाध्यक्ष

Share

नाशिक । प्रतिनिधी
जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या चेअरमनपदी संभाजी पवार तर, व्हाईस चेअरमनपदी शशीकांत आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड जाहीर झाल्यानंतर पवार व आव्हाड समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली.दोघांनी मजूर संघांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले.

जिल्हा मजूर संघाचे तत्कालीन चेअरमन हरिभाऊ वाघ व व्हाईस चेअरमन आशा चव्हाण यांनी पदाची मुदत संपल्याने राजीनामे दिले होते. रिक्त झालेल्या या पदासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेतर्फेे शुक्रवारी (दि.14) निवडणूक घेण्यात आली. संघाच्या कार्यालयात निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन चेअरमन व व्हाईस चेअतमन निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली. बैठकीत चेअरमनपदासाठी संभाजी पवार यांच्या नावाची सूचना संचालक शिवाजी रौंदळ यांनी केली.

त्यास सतिश सोमवंशी यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमनपदासाठी आव्हाड यांची सूचना संचालक शशीकांत उबाळे यांनी दिली. त्यानंतर सुरेश भोये यांनी आव्हाड यांच्या नावाला अनुमोदन दिले. दोन्ही पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने, निवडणुक अधिकारी सौंदाणे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

निवड झाल्यानंतर नूतन चेअरमन पवार व व्हा. चेअरमन आव्हाड यांचा पुष्पगुच्छ देऊन संचालक मंडळाने स्वागत केले. जिल्हयातील मजूर संस्थांच्या हितासाठी व संवर्धनासाठी अडीअडचणी सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे पवार व आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, संघाचे तज्ज्ञ संचालक राजेंद्र भोसले, जेष्ठ संचालक संपतराव सकाळे, योगेश (मुन्ना) हिरे, हरिभाऊ वाघ, शिवाजी कासव, प्रमोद भाबड, दिनकर उगले, जगन्नाथ वाजे, चिंतामण गावित, प्रमोद मुळाणे, योगेश गोलाईत, विठ्ठलराव वाजे, आशा चव्हाण, प्रतिभा शिरसाठ आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!