जि. प . आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

0

नाशिक । दोन वर्षांपासून रेंगाळलेल्या जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाला  मुहुर्त मिळाला आहे.पदाधिकाऱ्यांमधील अतंर्गत वादामुळे रखडलेल्या दोन वर्षातील तालुकानिहाय पुरस्काराची घोषणा आज (दि.४) रात्री उशीरा शिक्षण विभागाने  केली. उद्या  (दि.५) सकाळी ११ वाजता परशुराम सायखेडकर सभागृहात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

शिक्षक दिनाच्या औचित्याने दरवर्षी शिक्षण विभागाकडून जिल्हयातील आदर्श शिक्षकांना सन्मानीत केले जाते. सन २०१७ मध्ये तालुकानिहाय शिक्षकांकडून प्रस्ताव मागवून पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत न झाल्याने पुरस्कार यादी लटकली होती. त्यामुळे आदर्श शिक्षक पुरस्कार यादी ही गुलदस्त्यातच राहिली. पुरस्कार वितरण सोहळाही यामुळे होऊ शकला नाही. यंदाही शिक्षण विभागाने तालुकानिहाय प्रस्ताव मागविले. यात २८ प्रस्ताव प्राप्त झाले. यात शिक्षक पुरस्कार निवड समितीची बैठक होऊन यादी निश्चित करण्यात आली.

जि.प. अध्यक्षा शितल सांगळे यांच्या हस्ते  पुरस्कार  वितरण होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती यतींद्र पगार असणार आहे. यावेळी उपाध्यक्षा नयना गावित, सभापती मनिषा पवार, अपर्णा खोसकर, सुनिता चारोस्कर, गटनेते धनराज महाले, डॉ. आत्माराम कुंभार्डे, उदय जाधव, यशवंत गवळी प्रमुख अतिथी म्हणून तर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे आदी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जि.प.च्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झनकर व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केले आहे.

पुरस्कारर्थी शिक्षक सन २०१७ 
खंडू नानाजी मोरे (देवळा), दीपक राजाभाऊ शेलार (सिन्नर), अनुराधा रघुनाथ तारगे (दिंडोरी), मनोहर लक्ष्मण महाले (पेठ), नामदेव लक्ष्मण बेलदार (त्र्यंबकेश्वर), संजय ताराचंद देवरे (नांदगाव), संजय सोमनाथ येशी ((नाशिक), विजय प्रल्हादसिंह परदेशी (येवला), हंसराज मधुकर देसाई (मालेगाव), निलेश विनायक शिंदे (निफाड), परशुराम धनाजी गांगुर्डे (सुरगाणा), प्रकाश जगन्नाथ परदेशी (चांदवड), भास्कर मोतीराम बहिरम (कळवण), नवनाथ दादा वटवल (इगतपुरी), किशोरकुमार भिकाजी मेधने (बागलाण).

पुरस्कारर्थी शिक्षक सन २०१८ 
गंगाधर पंडीत लोंढे (देवळा), सुभाष शंकर गवळी (सिन्नर), दत्तात्रय विठ्ठल चौगुले (दिंडोरी), भगवान महादु हिरकुड (पेठ), देवासिंग धनासिंग बागुल (त्र्यंबकेश्वर), दीपक कडू हिरे (नांदगाव), प्रल्हाद राघो निकम (नाशिक), नूतन रमेश चौधरी ((मालेगाव), सुरज छगन झाल्टे (येवला), शिवाजी निवृत्ती विंचू (निफाड), शिवराम मोतीराम देशमुख (सुरगाणा), संजय हरी गवळी (चांदवड), बाबाजी मधुकर आहेर (कळवण), हरिश्चंद्र रायभान दाभाडे (इगतपुरी), सुंगध विष्णू भदाने (बागलाण).

LEAVE A REPLY

*