Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

टँकरला 1 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Share

नाशिक ।  प्रतिनिधी
जून महिना संपला तरी सर्वदूर पावसाची असलेली प्रतीक्षा असून ग्रामीण भागात अजुनही पाण्याचे गंभीर दुर्भिक्ष्य आहे. शासन निर्णयानूसार 30 जून पासून टँकर बंद केले जातात. मात्र, यंदा पावसाने आगमन लांबल्याने दुष्काळाची दाहकता कायम आहे.

ते बघत राज्य शासनाने टंचाई अंतर्गत राबविण्यात येणार्‍या उपाय योजनांची मुदत वाढवली आहे. त्यानूसार टँकरला येत्या 1 ऑगस्टर्पंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात दुष्काळाची भयाण परिस्थिती असून पाण्याची व जनावरांच्या चार्‍याची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. आठ तालुके व इतर तालुक्यातील 17 मंडळात दुष्काळ पडला आहे. धरणाचां जिल्हा अशी ओळख असली तरी सदया पाणीबाणी सारखी परिस्थिती उद्भवली आहे. 400 टँकरद्वारे 1278 गाव व वाडयांची तहान भागविली जात आहे.

टँकरच्या संख्येचा यंदाचा हा विक्रम ठरला आहे. जून महिन्यात राज्यात सर्वदूर वरुणराजा हजेरी लावतो. मात्र, यंदा जून महिना लोटला तरी दमदार पावसाची राज्याला प्रतीक्षा आहे. धरणे कोरडीठाक पडली असून नदी,नाले अदयाप आटलेली आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. पावसाच्या तुरळक सरी कोसळत असल्या तरी दुष्काळापासून जनतेला अदयाप दिलासा मिळाला नाही.

ग्रामीण भागात तर,पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य आहे.  शासन नियमानूसार 30 जूनला टंचाई उपाय योजना बंद केल्या जातात. मात्र, यंदा पावसाचे आगमन लांबल्याने ग्रामीण भागात पाणीबाणी कायम आहे. ते बघात टंचाई उपाय योजनांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी ग्रामीण जनतेकडून केली जात होती.

याबाबत शासनाने शनिवारी (दि.29) परिपत्रक काढून पाणी पुरवठा, टँकर, चारा छावण्या आदींना मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातली जनतेला दुष्काळात दिलासा मिळाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!