Type to search

क्रीडा

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या जिल्हा संघ निवड चाचणी दुसरा टप्पा पूर्ण

Share

नाशिक : शनिवार १६ नोव्हेंबर पासून आरंभ झालेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना आयोजित १४ वर्षाखालील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी चा दुसरा टप्पा आज पार पडला.

चारशे पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवलेल्या या निवड चाचणीतून छाननी करून आज रविवारी १७ नोव्हेंबर रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे १७० खेळाडू निवडण्यात आले. यात २० जण नाशिक ग्रामीण भागातील आहेत. यातून ११ संघ चमू तयार करून सोमवारपासून सुयोजित व रवींद्र विद्यालय मैदानावर सामने खेळविण्यात येतील.

सदर निवड चाचणी निवड समितीचे सदस्य सतिश गायकवाड व तरुण गुप्ता यांच्या सह बाळू मंडलिक, फैय्याज गंजीफ्रॉकवाला, अण्णा पार्टे, राजू आहेर यांनी पार पाडली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!