Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : कैदयांनी तयार केलेल्या खुर्चीची जिल्हाधिर्‍यांना भुरळ

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकरोड कारागृहातील कैदयांनी कलाकुसरीने तयार केलेल्या फर्निचरची अनेकांना भुरळ पडते. अनेकजण या ठिकाणांहून फर्निचर खरेदी करतात. या यादीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भर पडली असून त्यांनी त्यांच्या कार्यालयीन वापरासाठी कैद्यांनी तयार केलेली खुर्ची विकत घेतली आहे. एकप्रकारे कैदयांच्या कलागुणांना दाद देत त्यांनी या कृतीद्वारे प्रोत्साहन दिले आहे.

कारागृहात दर तीन महिन्यांनी होणार्‍या बैठकीचे जिल्हाधिकारी प्रमुख असतात. मंगळवारी (दि.30) या बैंठकीसाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे कारागृहात गेले होते. यावेळी तेथे बंदयांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्यात लाकडी फर्निचरचा देखील समावेश होता.

बंदयांनी त्यांच्यातील कलात्मकतेचा उपयोग करत लाकडावर कलाकुसर करुन तयार केलेले फर्नीचर देखील ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनाला मनसोक्त दाद देत जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या कार्यालयासाठी एक खुर्ची खरेदी केली. तसेच, घरासाठी फर्निचर देखील खरेदी केले. तसेच, बंदयांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांच्या पांठीवर एकप्रकारे शाब्बासकी दिली. तसेच, नाशिकचे माजी पोलिस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांंची बदली औरंगाबादला झाली असली तरी त्यांनी देखील कारागृहातील बंंदिनी केलेले फर्निचर खरेदी केले आहे.

दरम्यान, या घटनेचे एक ट्वीट ‘देशदूत’ने जिल्हाधिकाऱ्यांचा खुर्चीसह पोस्ट केले होते. त्या ट्वीटला एका युजरने ‘दिखावा’ असा उल्लेख करत रिप्लाय केला.

यावर जिल्हाधिकाऱ्यांनी खुर्चीवर मी बसून काम करणार आहे. काम करत असताना मी दिसतो खुर्ची मात्र दिसणार नाही  त्यामुळे दिखावा करण्याचा प्रश्न येत नाही असे त्यांनी उत्तर दिले.  जिल्हाधिकारयांच्या उत्तरानंतर या युजरने ‘माझे शब्द मागे घेतो’ असे म्हणत अप्रत्यक्ष माफीही मागितली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील नो इशू, म्हणत युजरच्या वक्तव्यावर पडदा टाकला.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!