नाशिक जिल्हा ऍथलेटिक्स् असोसिएशनच्या स्पर्धांना उत्साहात प्रारंभ

0

नाशिक, ता. २९ : नाशिक जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशनच्या वतीने दिनांक २९ आणि ३० जुलै रोजी कनिष्ठ गटाच्या जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये १४ वर्षाआतील मुले- मुली, १६ वर्षाआतील मुले- मुली, १८ वर्षाआतील मुले- मुली आणि २०  वर्षाआतील मुले- मुली अशा चार मुलांच्या आणि चार मुलींच्या गटाचा समावेश आहे.

या स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या हिरावाडी येथील मिनाताई  ठाकरे  विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेला आज शनिवार दिनांक २९ जुलै रोजी मोठया  उत्साहात प्रारंभ झाला.

या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, नाशिक ऍथलेटिक असोसिएशनचे उपाध्यक्ष मेजर झरेकर, या स्पर्धेचे संयोजन अध्यक्ष गंगाधर जाधव, या स्पर्धेसाठी मदत करणारे राहुल देशमुख, माजी खेळाडू राजेंद्र ठाकरे, नाशिक ऍथलेटिक असोसिएशनचे कार्याध्यक्ष हेमंत पांडे, सरचिटणीस राजीव जोशी, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ जयप्रकाश दुबळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या वेळी डॉ जयप्रकाश दुबळे यांनी सांगितले की नाशिक जिल्यात मैदानी खेळासाठी आवश्यक गुणवत्ता असलेले चांगले खेळाडू आहेत आणि नाशिकची ऍथलेटिक संघटनाही यासाठी चांगले काम करत आहे त्यामुळे या खेळात नाशिकच्या अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अनेक पदकांची कमाई केलेली आहे.

 

आज या स्पर्धेच्या माध्यमातून या क्रीडांगणावर नाशिक जिल्हातील विविध शाळांचे ऐकून ६३० खेळाडू सहभागी झाले आहेत हे नाशिकच्या ऍथलेटिक संघटनेचे यश आहे. अशाच स्पर्धामधून चांगले खेळाडू घडू शकतात. याकमी शासनाच्या वतीनेही खेळाडूंना आणि संघटनेला सर्व याप्रकारची मदत केली जाईल असे यावेळी सांगितले.

यावेळी गंगाधर जाधव आणि राहून देशमुख यांनीही खेळाडूंना मार्गर्दर्शन केले.

या स्पर्धा नाशिकच्या विभागीय संकुलातील सिन्थेटिक मैदानावर आयोजित केल्यामुळे भर पावसातही या स्पर्धा नियमीत सुरु  करणे शक्य  झाले आहे. या स्पर्धेत २० वर्षातील गटातील मुलामध्ये विजय ठरलेल्या खेळाडूंनाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदके आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेत समावेश असलेल्या १४ वर्ष १६ वर्ष, १८ वर्ष आणि २० वर्ष मुले आणि  मुलीच्या प्राथमिक स्पर्धांना सकाळपासून प्रारंभ झाला.

आज दिवसभर स्पर्धा सुरु असून उद्या सकाळी ०८.०० पासून स्पर्धांना सुरवात होणार असून सायंकाळी ०५ .०० वाजता या स्पर्धाच समारोप होणार आहे आणि या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे या सर्व गटाच्या मुला  – मुलींची नाशिकच्या संघात निवड केली जाणार असून हे निवड झालेले खेळाडू राज्य स्पर्धेत नाशिकचे प्रतिनिधीत्व करतील अशी  अशी माहिती हेमंत पांडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*