Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यातील १३७ रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी अर्थसंकल्पातून १५८३.८७ कोटी निधीस मंजुरी

Share

भुजबळांच्या प्रयत्नातून नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांचे रुपडे पुन्हा पालटणार

नाशिक :

राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांचे पुन्हा रुपडे पालटणार असून सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पातून नाशिक जिल्ह्यातील एकूण १३७ रस्त्यांच्या सुधारणेसाठी सुमारे १५८३.८७ कोटी रुपयांचा निधीस मंजुरी मिळाली आहे.

गेल्या पाच वर्षात नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली होती. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील विकासाचा बॅकलॉक भरून काढण्यास सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ना. छगन भुजबळ यांनी शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने नाशिकच्या विकास कामांसाठी निधी मिळण्यास सुरवात केला. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला पहिल्याच टप्प्यात दीड हजार कोटीहून अधिक निधी रस्ते विकासासाठी प्राप्त झाला आहे.

येवला मतदारसंघातील १८ रस्त्यांच्या सुधारणेसाठी अर्थसंकल्पातून ४७ कोटींचा निधी मंजूर अर्थसंकल्पामध्ये येवला मतदारसंघातील १८ रस्त्यांचा समावेश असून त्यासाठी ४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच येवला मतदारसंघासह नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांना झळाळी प्राप्त होणार असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.

यामध्ये येवला मतदारसंघातील अनकाई-न्यायगव्हाण-पिंपळखुटे-पहाळसाठे-राजापूर प्रजिमा-७० या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी १८० लक्ष, प्रमुख राज्य मार्ग २ ते नैताळे ते राज्य मार्ग २७ दिंडोरी तास-खानगाव थडी-तारूखेडले-तामसवाडी खेडले झुंगे-कोळगाव-रुई-धानोरे -डोंगरगाव-विंचूर-विठ्ठलवाडी- कोटमगाव राज्य मार्ग २७ला मिळणाऱ्या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ४ कोटी ५०लक्ष, पाटोदा-सावरगाव-नगरसूल-वाईबोथी-भारम प्रजिमा- ६८ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी, रामा-१० ते तांदूळवाडी-गुजरखेडा-विखरणी-कातरणी प्रजिमा १५८ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५ कोटी ०५ लक्ष, सावरगाव-धुळगाव-एरंडगाव-भिंगारे-महालखेडा-चोरवड-दत्तवाडी -शिरवाडे प्रजिमा ७२ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ४० लक्ष, तिसगाव -बहादूरी –वडनेर-भैरव-वडाळीभोई रामा २५ किमी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लक्ष, प्र. जि. मा. ७९ येवला गणेशपूर (सुकी) हडपसावरगांव-जायदरे प्र. जि. मा. ७० रस्ता प्रजिमा १६२ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लक्ष, येवला-पारेगाव-निमगावमढ-महालखेडा -भिंगारे -पुरणगाव ते प्ररामा-२ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५ कोटी ४९ लक्ष निधीस मंजुरी मिळाली आहे.

त्याचबरोबर सावरगाव-धुळगाव-एरंडगाव-भिंगारे-महालखेडा चोरवड-दत्तवाडी-शिरवाडे-वाकद ते अहमदनगर जिल्हा हद्द रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ७८ लक्ष,मुखेड-जळगाव नेउर-सातारे-पिंप्री -ठाणगाव-गुजरखेडा प्रजिमा ७१ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ८० लक्ष, मुखेड-जळगाव नेउर-सातारे –पिंप्री-ठाणगाव -गुजरखेडा प्रजिमा-७१ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ८० लक्ष, प्र.जि.मा. ७९ येवला गणेश (सुकी) हडपसावरगांव- जायदरे ते प्र.जि.मा. ७०, प्र. जि. मा. १६२ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ८० लक्ष, प्रजिमा ६९ ते म्हरळगोई-वाहेगाव-नांदगाव-धारणगाव-गाजरवाडी प्रजिमा १२७ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ५० लक्ष, तर चांदवड-लासलगाव-विंचूर रस्ता रामा क्र. ७ किमी. रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ६ कोटी अशा एकूण १८ रस्त्याच्या सुधारणेसाठी एकूण सुमारे ४७ कोटी रुपयांच्या निधीस अर्थसंकल्पातून मंजुरी मिळाली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!