Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कामचुकारपणा करणारा ठेकेदार काळ्या यादीत; नाशिक जिल्हा प्रशासनाची कारवाई

Share

नाशिक : लोकसभा निवडणुकीत मतदार पुर्नरिक्षण कार्यक्रमात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी यांनी संबधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले आहे. तसेच, त्याची दहा लाखांची बँक गॅरीटीही जप्त केली आहे. मात्र, ही कारवाई दोन महिन्यांपुर्वी करण्यात आली होती. त्याची माहिती तब्बल दोन महिने उशीराने मंगळवारी (दि.25) प्रशासनाने दिली.

दरम्यान, ठेकेदाराने या कारवाई विरोधात न्यायालयात धाव घेतली असून जिल्हा प्रशासनालाच नोटीस पाठविली आहे. त्यामुळे हा वाद पुढील काळात रंगणार आहे.

मतदाराकडून प्राप्त होणार्‍या अर्जाची डाटा एन्ट्री करण्यासाठी जिल्हयातील 15 विधान सभा मतदारसंघातील म्हणजेच 19 तहसील कार्यालयात एक डाटा एन्ट्री ऑपरेटर या प्रमाणे 19 ऑपरेटर नियुक्त करण्यात आले होते. त्यासाठी रितसर ऑनलाईन निविदा काढण्यात आली. त्यामध्ये एका स्वयं रोजगार संस्थेला प्रति ऑपरेटर 12 हजार 100 इतका सर्वात कमी दर भरला. त्यामुळे त्यांना हे संपूर्ण जिल्हतील 19 ऑपरेटरचे कंत्राट देण्यात आले.

परंतु संबधित ठेकेदार योग्य सेवा देत नसल्याच्या तक्रारी वाढत होत्या. या प्रकरणी जिल्हा निवडणूक विभागाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत कामात सुधारणा करण्याची संधी दिली.परंतु तरीही संस्थेकडून कुठलिही सुधारणा करण्यात आली नाही. त्यामुळे निविदेतील अटी शर्तींचा भंग तसेच निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी या ठेकेदाराला काळया यादीत टाकत त्यांची बॅक गॅरंटी जप्त केली.

त्यामुळे या ठेकेदाराला पुढील पाच वर्ष राज्यात कोठेही काम मिळणार नाही. मात्र, ही कारवाई जिल्हाधिकार्‍यांनी 15 एप्रिल 2019 मध्ये म्हणजेच दोन महिन्यांपुर्वी केली होती. ठेकेदाराने या बाबत न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेत जिल्हा प्रशासनाला नोटीस पाठवली असल्याचे सांगितले आहे. या नोटीस मध्ये हा निर्णय मनमानी व आकसाने घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!