Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : म्हसरुळ परिसरात वाहनांची तोडफोड; गुन्हेगारांचे पुन्हा नाशिक पोलिसांना आव्हान

Share

नाशिक : सशस्त्र दरोड्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच पुन्हा महसुल परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. शहरात वाहनफोडीचे सत्र सुरूच असून, काल रात्री म्हसरूळ परिसरातील सुमारे चार ते पाच वाहनांच्या काचा फोडल्या.

दरम्यान, काल रात्रीच्या सुमारास अज्ञात टोळक्याने कार, स्कॉर्पिओ, आणि अन्य वाहनांच्या काचा फोडल्या असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

यामुळे शहरातील गुन्हेगारी रोखण्यात पोलीस यंत्रणेला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. सततच्या वाहन तोडफोडीमुळे या टोळक्यांना चाप लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!