Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

डिप्लोमाची प्रवेशप्रक्रिया सुरू; १८ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत

Share

नाशिक । प्रतिनिधी

राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) इयत्ता दहावीनंतरच्या प्रथम वर्ष इंजिद्गनअरिंग पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया जाहीर झाली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या 18 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पहिल्या फेरीतील प्रवेशासाठीची गुणवत्ता यादी एक जुलै रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी ही प्रवेशप्रक्रिया एक महिन्यापूर्वी सुरू करण्यात आल्याचे ‘डीटीई’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया निकाल लागण्यापूर्वी जाहीर केली आहे. दहावी उत्तीर्ण असणार्‍या विद्यार्थ्याला डिप्लोमाला प्रवेश घेता येईल. या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना 30 मे ते 18 जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.

या कालावधीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे आणि दाखले अपलोड करायचे आहेत. या प्रक्रियेनंतर 19 जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीबाबत काही आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांनी 20 आणि 21 जून रोजी फॅसिलिटेशन सेंटरमध्ये नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी 24 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

‘कॅप’च्या पहिल्या फेरीला 24 जून रोजी सुरुवात होणार आहे. या दिवशी राज्यात डिप्लोमा प्रवेशासाठी उपलब्ध असणार्‍या एकूण जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना 25 ते 28 जून या कालावधीत कॉलेजांचे पर्याय भरून ते निश्चित करायचे आहेत. पहिल्या फेरीसाठी एक जुलै रोजी कॉलेज अ‍ॅलॉटमेंट यादी जाहीर होणार आहे.

यादीनुसार, विद्यार्थ्यांना दोन ते पाच जुलैदरम्यान एआरसी केंद्रावर जाऊन प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया करायची आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांना दोन ते सहा जुलैदरम्यान अ‍ॅलॉट झालेल्या कॉलेजमध्ये जाऊन कागदपत्रांसह शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. ’कॅप’च्या दुसर्‍या फेरीला आठ जुलै रोजी सुरुवात होणार आहे, अशी माहिती ’डीटीई’ने दिली आहे. प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक आणि माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे.

विद्यार्थ्याला पर्यायानुसार पहिल्या क्रमांकावरील कॉलेज मिळाल्यास त्याला त्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेणे अनिवार्य राहणार आहे. संबंधित विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्यास त्याला पुढच्या ‘कॅप’ फेर्‍यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार नाही.
विद्यार्थ्यांनी खालील वेबसाइटवर धिक माहिती मिळवावी. http/poly19. dtemaharashtra. org/diploma19/

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!