Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

उमराणे : विद्युत खांबाचा शॉक लागून बैल ठार

Share

उमराणे : वार्ताहर । येथील शनिमंदिराजवळ विद्युत खांबाचा शॉक लागल्याने बैल जागीच ठार झाला तर शेतकऱ्यास वाचवण्यास ग्रामस्थांना यश आले आहे.

कुंभार्ढे येथील शेतकरी हरिचंद्र अहिरे (वय ५७) हे खारीपाडा गावात राहणाऱ्या हिरुबाई अहिरे यांच्या शेतात चार बैल, गाडी व अवजारे घेऊन जात होते.

उमराणे गावाजवळ समोरून वाहन आल्याने बैलगाड़ी बाजूस घेत असताना होर्नच्या आवाजाने मागे असलेला बैल बिथरल्याने एका विजेच्या खांबास बांंधलेल्या तारास धडक दिली. दरम्यान पाऊसही चालू असल्याने विद्युत प्रवाह उतरून बैल जागीच ठार झाला.

यावेळी शेतकरी अहिरे हे बैलाला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना त्यांनाही शॉक बसला. जवळच उभ्या असलेल्या तरुणांनी व ग्रामस्थानी सदर शेतकऱ्यास वाचविले. घटनेचा पंचनामा तलाठी व विद्युत महामंडळाचे अधिकाऱ्यांनी केला. ऐन शेतीच्या कामाच्या वेळी बैल ठार झाल्याने अहिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!