Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी : जिल्ह्यातील सर्वात मोठा तुलसी विवाह संपन्न; हजारोंचे सामूहिक शुभमंगल

Share

चिंचखेड : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे भव्य तुलसीविवाह हजारोंच्या उपस्थितीत शनिवारी पार पडला. शुक्रवारी सकाळी मांडव डहाळे यांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी दिवट्या बुधल्या यांचा कार्यक्रम तसेच तुळशीला हळद लावण्याचा कार्यक्रम झाला. शनिवारी सकाळी बहुसंख्य बैलगाड्यांच्या उपस्थित गावभर मिरवणूक झाली.

तसेच सायंकाळी गोरज मुहूर्तावर नाशिक जिल्ह्यातील सर्वांत मोठा तुलसीविवाह चिंचखेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यामध्ये अनेक प्रकारचे अश्व नृत्याचे थरार बघायला मिळाले. तसेच अनेक बँड पथकांनी या विवाह सोहळ्याला मोफत हजेरी लावून संपूर्ण गावातून मिरवणूक काढली. यावेळी बँड पथकांची जुगलबंदी बघायला मिळाली.

तुलसी विवाह सोहळा मध्येच एक वधू आणि वर विवाहबद्ध झाले.विवाह संपन्न झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, या कार्यक्रमाला खासदार भारती पवार यांच्यासह अनेक राजकारणी मंडळी आणि सेलिब्रिटी यांनी हजेरी लावली. खासदार भारती पवार यांनी चिंचखेड येथील भव्य तुलसी विवाह सोहळ्याचे कौतुक केले. कार्यक्रमाला उपस्थित झालेल्यांना भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्याला जिल्ह्यासह राज्यभरातून विविध क्षेत्रातील नागरिकांनी हजेरी लावली.

या सोहळ्याचे विशेषता म्हणजे हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित असताना देखील हा कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा होतो. दुर्दैवाने काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून या सोहळ्याला पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे आणि पंचक्रोशीतील नागरिकांचे आयोजकांच्या वतीने तसेच चिंचखेड ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!