Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी : सात वर्षीय बालिकेवर अत्याचार; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Share

दिंडोरी : तालुक्यातील कोराटे येथे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आलेल्या भाचीच्या सातवर्षीय मैत्रिणीवर ३६ वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली असून पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संशयिताविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

कोराटे येथील हेमराज अशोक कदम (वय ३६ )हे वस्तीवर राहतात. दिवाळीनिमित्त त्यांची भाची व सात वर्षीय मैत्रीण ही ०१ नोव्हेंबरला त्यांच्याकडे आली होती .
०४ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ ते बाराच्या सुमारास ही बालिका झोपली होती. हेमराज अशोकराव कदम याने बालिका झोपलेली असताना तिचे तोंड दाबून अत्याचार केला असल्याची तक्रार बालिकेच्या आईने दिंडोरी पोलीस ठाण्यात दिली.

त्यानुसार दिंडोरी पोलिसांनी हेमराज कदम विरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले करत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!