दिंडोरी-नाशिक रस्त्यावर झालेल्या अपघातात शेतकरी ठार

0

दिंडोरी : दिंडोरी नाशिक रस्त्यावर वाडा हॉटेल जवळ झालेल्या अपघातात दळवतचे शेतकरी ठार झाला असून अन्य एक जखमी झाला आहे.

ढकांबे जवळ वाडा हॉटेल नजीक अल्टो कार (एम आच 15 जी ऐ 7125) व पल्सर (एमएच ४१ एच १८४१ ) या वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली.

त्यात मोटरसायकल वरील पतींग देशमुख (राहणार दळवत, ता. कळवण) हे जागीच ठार झाले. अन्य एक जण जखमी झाला असून त्यास नाशिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

LEAVE A REPLY

*