Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरीत राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ व शिवसेनेचे भास्कर गावित आमनेसामने

Share

नाशिक : विधानसभा निवडणुकांचा धुरळा उद्यापासून उडणार असून आज अर्ज मघारीची मुदत संपुष्टात आली आहे. या दरम्यान दिंडीरो पेठ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ व शिवसेनेचे भास्कर गावित यांच्यात सरळ लढत होणार असल्याने येथील लढत चुरशीची होणार आहे.

दरम्यान जिल्ह्यातील अनेक मतदारसंघातील ठराविक उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामध्ये माजी आमदार रामदास चारोस्कर, धनराज महाले, दिपक नरहरी झिरवाळ यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ व शिवसेनेचे भास्कर गावित यांच्यात सरळ लढत होणार आहे.

उद्यापासून प्रचाराचा गुलाल उधळला जाणार असून जिल्ह्यातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चुरशीच्या लढती होणार अशी चर्चा आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!