Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी : नाशिक-पेठ महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू; बसचालक फरार

Share

दिंडोरी : नाशिक-पेठ महामार्गावर गोळशी फाट्यानजीक अपघात झाला असून ये अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. मनोहर लिलके असे मृत झालेल्या चालकाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि पेठकडून गोळशी फाट्याकडे बजाज सीटी १०० एमएच. १५ एफ बी ३२८९ दुचाकीवर जात असताना हॉटेल नंदिनी नजीक गुजरात डेपोच्या बसने समोरून जोरदार धडक दिल्याने फोपळवाडे येथील पोलीस पाटील मनोहर लिलके जागीच ठार झाले.

याबाबत दिंडोरी पोलीस ठाणे यांना कळताच पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोलीस हवालदार शिलावते घटना स्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनसाठी दिंडोरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बससह बसचालक बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!