वंचित बहुजन आघाडीकडुन दिंडोरीतून निवृत्त पीएसआय मैदानात

0

नाशिक : वंचित बहुजन आघाडीच्या दिंडोरी मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून निवृत्त पीएसआय बापू बर्डे यांच्या नावाची घोषणा पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे. तसेच नाशिकमधून भारिपचे जिल्हाध्यक्ष पवन पवार यांना उमेदवाराची जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या धनराज महाले, माकपचे जेपी गावित यांच्याशी लढत होणार असून अदयाप इतर पक्षांच्या उमेदवारांची नवे जाहीर होणार आहेत.

दरम्यान दिंडोरी लोकसभा मतदार संघात निवृत्त पीएसआय बापू बर्डे यांना उमेदवारी जाहीर केली आहे . समाज सेवेसाठी त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली होती. ठाणे जिल्ह्यात ३४ वर्ष पोलिस दलाची सेवा त्यांनी केली . दीड वर्षापूर्वी त्यांनी गुप्त बैठका घेऊन त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली होती. मुलाखत घेऊन आंबेडकर यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली .

लोकसभा निवडणुकीसाठी आज बहुजन वंचित आघाडीकडून ३७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून जागावाटपावर तोडगा न निघाल्यामुळे अखेर वंचित आघाडीकडून ४८ पैकी ३७ उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली.

LEAVE A REPLY

*