नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील दोन्ही जागा विजयी होतील : छगन भुजबळ

0

नाशिक : देशात महागाई, बेरोजगारी, नोटबंदी,जीएसटी आणि जातीयवाद यामुळे देशातील जनता अडचणीत आली असून लोकशाही व्यवस्था वाचविण्यासाठी आगामी लोकसभेची लढाई ही संविधान विरुद्ध मोदी अशी लढाई असेल असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांकडून नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा झाली. त्यानंतर आज भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यापुढील काळात नाशिकमध्ये अनेक नवीन उद्योग आणि विकास कामे येण्यासाठी आमचा प्रयत्न असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नाशिक मतदारसंघाचे उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ, दिंडोरी मतदारसंघाचे उमेदवार मिळालेले माजी आमदार धनराज महाले, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार जयवंतराव जाधव, कॉंग्रेसचे नेते उत्तम कांबळे, जिल्हाध्यक्ष ऍड . रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनपा गटनेते गजानन शेलार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व आघाडीतील मित्र पक्षांकडून उमेदवाराची घोषणा होण्याच्या आगोदरपासून गाव पातळीवर बूथ कमिट्याची रचना करण्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरु होते. तसेच विविध गावांगावांमध्ये भेटीगाठी घेऊन जनतेची मते समजून घेत निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे. आता उमेदवारीची घोषणा झाल्याने याला अधिक बळ मिळणार असून आगामी निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील दोन्ही जागा विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

LEAVE A REPLY

*