Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : दिंडोरी : ओझे येथील कादवा नदीत बुडून तिघांचा मृत्यू

Share

ओझे । वार्ताहर : दिंडोरी तालुक्यातील ओझे कादवा नदीवर सकाळी ११ वाजे दरम्यान कपडे धुण्यासाठी व ओझे येथे पाहुणे आलेली अनिता यादव वाघमारे (वय 29) तसेच मुलगा ओंकार यादव वाघमारे (वय14)रा उमराळे खुर्द तसेच प्राजक्ता बाळू गांगोडे (वय १५) रा. ओझे हे कादवा नदीत बुडाले असून अनिता यादव वाघमारे यांना ग्रामस्थांनी पाण्यात बाहेर काढले असून अनिता वाघमारे यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान या घटनेतील प्राजक्ता गांगोडे या मुलीला ३. १० वाजता कादवा नदीतून बाहेर काढण्यात आले आहे. सदर मुलगी ओझे येथील आहे. तसेच या घटनेतील मयत अनिता वाघमारे ही उमराळे खुर्द येथील असून ओझे येथे भेटण्यासाठी आल्या होत्या. यांच्या मुलाचा शोध चालू आहे. 

तसेच ओंकार वाघमारे व प्राजक्ता गांगोडे यांना ग्रांमस्थाच्या मदतीने शोधण्याचे काम चालू आहे. अनिता यादव वाघमारे उमराळे खुर्द येथील अंगणवाडीच्या मदतनीस आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!