दिंङोरी तालुक्यातील परमोरी येथे बिबट्याच्या हल्लात चिमुरडा ठार

0

दिंङोरी : तालुक्यातील परमोरी येथे बिबट्याच्या हल्लात सार्थक ज्ञानेश्वर दिघे (वय -3) हा चिमुरडा ठार झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, परमोरी येथील शेतकरी ज्ञानेश्वर दिघे हे कुटुंबासमवेत सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान शेतात टोमॅटो बांधणीचे काम करत असताना, त्यांचा तीन वर्षाचा सार्थक हा खेळत होता.

यावेळी अचानकपणे बिबट्याने बालकावर हल्ला केला. या हल्ल्यात सार्थकचा जागीच मृत्यू झाला. वर्षभरात तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. या घटने मुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*