Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी : सर्पदंश नव्हे तर अंधश्रद्धेने घेतला ‘ति’चा बळी

Share

नाशिक । प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यात असलेल्या रासेगावजवळील देहेरवाडीतील 14 वर्षीय शाळकरी मुलीचा घरकाम करताना सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. सर्पदंशानंतर तिला वैद्यकीय उपचारांची गरज असताना शहरातील मांत्रिकाकडे नेण्यात आले. त्याने मंत्र वापरून मुलीला घरी पाठवून दिले. मात्र अवघ्या एक तासातच तिचा मृत्यू झाला.

योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला असून आजही ग्रामीण भागात वैद्यकीय उपचाराला प्राधान्य दिले जात नसल्याचे अनुभवायला येत आहे. तसेच अंधश्रद्धेला खतपाणी मिळाल्याने तिचा बळी गेल्याचे बोलले जात आहे.

देवकी रमेश झुरडे (14, रा. देहेरवाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे दुर्दैवी मुलीचे नाव आहे. ती इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होती. तसेच शाळेत जाऊन तिला अवघे तीन दिवस झाले होते. शनिवारी दुपारी 3 वाजता देवकी घरात काम करीत होती. त्याचवेळी तिला विषारी सर्पाने दंश केला.

सदर घटना लक्षात येताच तिला रुग्णालयात न नेता शहरातील भद्रकालीत असलेल्या एका मांत्रिकाकडे विष उतरवण्यास आणण्यात आले. या मांत्रिकाने तिच्यावर मंत्र मारले व घरी जाण्यास सांगितले. घरी पोहोचल्यावर देवकीला उलटीचा त्रास झाला. प्रकृती जास्तच बिघडत चालल्याने तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला तपासून मृत घोषित केले.

कुणाला साप चावला तर सांगत नाही
कुणाला सर्पदंश झाला तर काही खेडेगावात त्याची वाच्यता केली जात नाही. तसेच ज्याला सर्प चावला आहे. त्याच्यावर महिलेची सावली पडू दिली जात नाही. त्यातून काळी जादू केली जाण्याची शक्यता असते, असा समज आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!