Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सरकार मायबाप … शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत?

Share
चामरलेणीला युवकाचा मृतदेह आढळला latest-news-nashik-found-body-of-young-man-at-chamarleni

चिंचखेड : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे शनिवारी सततची नापिकी आणि कर्जाचा वाढत चाललेला डोंगर यामुळे एका शेतकऱ्याने पालखेड डावा कालवा मध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे.

दरम्यान जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच असून याबाबत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे सध्याची परिस्थिती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने जून २०१७ मध्ये कर्जमाफी करण्याची घोषणा केली.
३४ हजार कोटींच्या या कर्जमाफीच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा भार हलका होईल आणि ते आत्महत्येकडे वळणार नाहीत अशी अपेक्षा होती. मात्र कर्जमाफीनंतरही राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. याउलट आत्महत्यामध्ये वाढ होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

आत्महत्येपासून शेतकऱ्यांना परावृत्त करण्यासाठी राज्य सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. कर्जमाफीपासून ते पीक विमा, शेततळे, अनुदान यांचा त्यात समावेश आहे. मात्र या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नसल्याने शेतकरी आत्महत्या मध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांची मुस्कटदाबी
नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शेतकरी आत्महत्यां दिवसेंदिवस वाढत आहे. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. सत्ताधारी पक्ष सत्तेच्या बळावर विरोधकांना फोडण्यात व अच्छे दिनच्या डिजिटल प्रचारात मग्न आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या अस सांगणाऱ्या पूजा मोरे सारख्या शेतकरी कन्येची सुद्धा मुस्कटदाबी केली जाते. या सगळ्या प्रकारावरून शेतकऱ्यांचे अच्छे दिन नाही तर बुरे दिन आलेत हेच सत्य आहे.                                                                                                                                                                           —- -संदीप जगताप, राज्य प्रवक्ता (स्वाभिमानी शेतकरी संघटना)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!