Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

माजी आमदार धनराज महाले स्वगृही परतणार; राष्ट्रवादीला दिंडोरीत खिंडार

Share

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते धनराज महाले हे आपल्या समर्थकांसह पुन्हा स्वगृही परतणार असून आज दुपारी महाले शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

दरम्यान यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार पडले असून शिवसेनेला पुन्हा बळकटी मिळणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत प्रवेश करण्याच्या हालचाली सुरु असून यामुळे राजकिय वातावरण तापले आहे. त्याचाच भाग म्हणून माजी आमदार महाले हे पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा आहे.

महाले हे जनता दलाचे माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे पुत्र असून, त्यांनी मागील दिंडोरी लोकसभा निवडणूक लढवली परंतु भाजपकडून डॉ. भारती पवार यांनी जोरदार टक्कर देत त्यांना पराभूत केले. आता त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने शिवनेला पुन्हा एकदा दिंडोरीत तगडा उमेदवार मिळणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!