Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

वणी सापुतारा महामार्गावर कारचालकाची लूट करणाऱ्या टोळीस अटक

Share

नाशिक : चारचाकी वाहनांना रस्त्यात अडवून वाहनचालकास मारहाण करीत वाहन चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून ०३ जिवंत काडतुसे, मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, लुटमारीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

दरम्यान हरिचंद्र कचरू शेवरे (वय ३१, रा. वांजुळे, ता.दिंडोरी, ब्रिजेश सोमदेव राय, (३१ रा. सुरत), दिपक मराठे (रा.जोलवा गाव, सुरत), बाळु तुकाराम पानडगळे, देविदास सुरेश पानडगळे, दोन्ही रा. वारे, ता. दिंडोरी) अशी या संशयित दरोडेखोरांची नावे आहेत.

दरम्यान १९ ऑक्टोबर २०१९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील खुंटीचा पाडा येथील रहिवासी श्री. जिवन गायकवाड सेलेरिओ कारने घरी जात असतांना वनारे फाटा परिसरात संशयितांनी गाड्या आडव्या लावून त्यांना मारहाण करीत सेलेरिओ कार, लॅपटॉप व मोबाईल फोन असा ०२ लाख ३० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने लुटमार करून नेला होता.

तसेच वरील अज्ञात आरोपीतांनी त्याच दिवशी वरील घटनेतील सेलेरिओ कार ही पेट्रोल भरण्यासाठी गोळशी फाटा परिसरातील आरती पेटोंलपंपावर घेवुन जावुन, सदर ठिकाणी पेटोंल पंपावरील इसमांना पिस्तुलचा धाक दाखवुन, लाकडी दांडयाने मारहाण करून दुखापत केली व पाच हजार रू.रोख रक्कम जबरीने लुटमार करून नेली होती. वरील दोन्ही घटनेबाबत वणी व दिंडोरी पोलीस ठाणेस जबरी लुटमार व आमॅअ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हे दाखल होते.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या मा.पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह मॅडम यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.के.के. पाटील यांचे पथकाने वरील गुन्हयांचा समांतर तपास सुरू केला.

या पथकाने सापळा रचत या संशयितांना अटक केली. यामध्ये लुटमारीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर संशयितांचा गुजरात येथील साथीदार नामे ब्रिजेश राय हा निंबायत जि.सुरत येथील खुनाच्या गुन्हयात अटक असल्याची माहिती मिळाली आहे. वरील गुन्हयातील इतर संशयितांचा स्थागुशाचे पथक कसोशीने शोध घेत असुन त्यांचेकडुन अजून काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!