Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी : इंग्रजी माध्यमातील १६ विद्यार्थ्यांचा जि. प. शाळेत प्रवेश

Share

चिंचखेड वार्ताहर : चिंचखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची प्रवेश दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिलीत दाखल पात्र विद्यार्थी यांना फुगे घेऊन वाजत गाजत संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली.

गल्लोगल्लीत ‘लहान मुलांना लावी लळा, जि. प. ची मराठी शाळा, मला जायचंय शाळेला, नवं काहीतरी शोधायला’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक दिंडीचा आनंद लुटला, त्यानंतर सर्व सन्माननीय सदस्य पालक व विद्यार्थी एकत्र येऊन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

यात शाळेत माझे पहिले पाऊल या उपक्रमाअंतर्गत मुलांचे पायाचे ठसे घेण्यात आले. पहिलीत दाखल झालेल्या सर्व मुलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले त्‍यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.याप्रसंगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील सोळा विद्यार्थ्यानी चिंचखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला. त्या सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचेही स्वागत करण्यात आले.

शाळेतील शिक्षक राठोड सर यांनी स्वत:चे दोघं मुलांचे नाव आपल्याच शाळेत दाखल केले.तसेच कोंडावार सरांनी शालेय उपक्रमांची माहिती दिली. तर ठाकरे सर यांनी गुणवत्ता वाढीसाठी अधिक मेहनत घेण्यासाठी सर्व शिक्षक प्रयत्नशील आहेत असे सांगितले. सौ संगीता घिसाडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारी परिसरातील एकमेव शाळा असे गौरवोद्गार काढले.

तर शाळा व्यवस्थापन अध्यक्ष यांनी मागील वर्षातील उपक्रमांची माहिती दिली. व सर्व शिक्षकांचे कौतुक केले. उपस्थित पालकांनी शालेय प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत जास्तीत जास्त मुलं जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्याचा संकल्प केला. शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना गोड पदार्थ म्हणून रवा वाटप करण्यात आला.

मुख्याध्यापक संजय चौधरी यांनी प्रास्ताविक केले. ठाकरे यांनी मान्यवरांचे आभार मानले. शाळेत बदलीने आलेल्या गुरव मॅडम यांचे स्वागत करण्यात आले. शिक्षकांनी गेल्या 3 दिवसापासून पालक गृहभेटी, शालेय स्वच्छता, मशाल फेरीचे आयोजन करत 100%पटनोंदणीचे उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान दुपार सत्रात केंद्रप्रमुख ठाकरे यांनी शाळेस भेट देऊन उपक्रमाची माहिती घेऊन प्रशासकिय मार्गदर्शन केले. नविन शैक्षणिक सत्रासाठी पंचायत समिती दिंडोरी शिक्षण विभागाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक आणि पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!