Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : त्र्यंबकेश्वरला दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी

Share

त्र्यंबकेश्वर विशेष प्रतिनिधी : ‘बम बम भोले’, हर हर महादेव च्या गजरात त्र्यंबकेश्वर येथे दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी दिसून आली. श्रावण महिन्यात ब्रम्हगिरी फेरी प्रदक्षिणा करण्यासाठी हजारो भाविकांनी पूण करत आनंद घेतला.

त्र्यंबकेश्वरला दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी

त्र्यंबकेश्वरला दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी त्र्यंबकेश्वर विशेष प्रतिनिधी : 'बम बम भोले', हर हर महादेव च्या गजरात त्र्यंबकेश्वर येथे दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी दिसून आली. श्रावण महिन्यात ब्रम्हगिरी फेरी प्रदक्षिणा करण्यासाठी हजारो भाविकांनी पूण करत आनंद घेतला. रविवारी रात्रीपासूनच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांनी कुशावर्तावर गर्दी केली. पहाटे स्नान करून प्रदक्षिणेस सुरुवात केली. निसर्गाचे वरदान लाभलेल्या ब्रह्मगिरी भोवती भाविकांनी 'बम बम भोले' चा गजर करत प्रदक्षिणा पूर्णे केली.Video : Mohan Kankate

Deshdoot यांनी वर पोस्ट केले सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

दरम्यान श्रावण महिना म्हटलं कि त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येते. पावसाचे दिवस असल्याने सगळीकडे निर्सगाने हिरवाई पसरलेली दिसते. त्यातच श्रावणी सोमवारचे औचित्य साधत पर्यटनही होते.

रविवारी रात्रीपासूनच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांनी कुशावर्तावर गर्दी केली. पहाटे स्नान करून प्रदक्षिणेस सुरुवात केली. निसर्गाचे वरदान लाभलेल्या ब्रह्मगिरी भोवती भाविकांनी ‘बम बम भोले’ चा गजर करत प्रदक्षिणा पूर्ण करीत होते.

त्र्यंबक नगरीतील इतर शिवमंदिरांमध्येही दर्शनासाठी स्थानिकांसह बाहेरगावचे भाविक दिसून येत होते. दरम्यान आज ईद तसेच दुसरा श्रावणी सोमवार यामुळे भाविकांची गर्दी वाढल्याने परिसरात उत्साहपूर्ण वातावरण आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!