नाशिक । जगण्याचे व्यवस्थापन : योगिता जगधने ( मार्केटिंग अँड फायनान्स )

0

माणसे जोडणे, सहकार्याची वृत्ती, जनसंवादाने-सुसंवादाने माणसांचे सहकार्य मिळवणे या गुणांनी मला ‘बिझनेस’, ‘फायनान्स’ क्षेत्रात स्थेर्य दिले. कार्पोरेट क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी अशा 20 हजाराहून अधिक लोकांना २०० हुन अधिक प्रेरणादायी मार्गदर्शन केले आहे. अनाथ मुलींसाठी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक सहभावना जपण्याचा प्रयत्न करत आहे.

नांदगावसारख्या छोट्या गावात माझे शिक्षण झाले. बालपण अत्यंत सामान्यपणे गेले. शिक्षणाची आवड होतीच, पुढे काहीतरी करून दाखवायची अशी खुणगाठ मनाशी बांधली. खगोल क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची उर्मी होती; परंतु अगदी लहान वयात माझा विवाह झाला. विवाहनंतरही शिक्षण सुरू ठेवले. 12 वी असताना मातृत्वाची जबाबदारी पडली. वडिलांच्या प्रेरणेने मी शिक्षण सुरू ठेवत बीएससी पदवी पूर्ण केली. एकीकडे आईपणाच्या जबाबदार्‍या पेलत शिक्षण सुरू होते. शिक्षणातून समाधान मिळत नव्हते, कारण काहीतरी करून दाखवण्याची उर्मी स्वस्थ बसू देईना तर दुसरीकडे मुलींचे संगोपण करत होते. शिक्षणाची आवड असल्याने त्यात सर्वोच्च देण्याचा प्रयत्न ठेवला. ‘बीएड’मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. वनस्पतिशास्त्र विषय घेऊन एम.एस्सी पूर्ण केले. इन्स्टिट्युट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज् जोधपूरमधून पूर्ण केली.

वयाच्या 19 व्या वर्षी माझा संघर्ष सुरू झाला. मुलीसाठी स्वत:च्या पायावर उभे राहणे अपरिहार्य होते. त्यासाठी छोट्या नोकरीचा अनुभव घेत होते. पुण्यामध्येही काहीकाळ काम केले. नंतर नाशिकमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात पडझड झालेल्या परिस्थितीची आणि मनाची पुनर्बांधनी हेच मोठे आव्हान होते. सुनील चांडक यांच्या मार्गदर्शनात ‘इडीआय’मध्ये उद्योजकतेेचे प्रशिक्षण घेतले. असंख्य कौटुंबिक अडचणी, आव्हानांवर मात करत मी स्वत:ला घडवत होते. आज इन्शुरन्स क्षेत्रात एजन्सी असोसिएट मॅनेजर म्हणून काम करत आहे. माझी स्वत:ची फायनान्स एजन्सी असून त्याद्वारेही काम सुरू आहे. स्वत: जगण्याचा संघर्ष पेलून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आज मी इतरांना प्रेरणादायी व्याख्याने देऊन त्यांच्याही समस्या, अडचणीतून बाहेर काढण्याचे शिक्षण देत आहे. इन्शुरन्स क्षेत्रात काम करताना काही लक्ष्य ‘टार्गेट’ मिळवायचे असतात, ते मी ‘अचिव्ह’ करत गेले. ‘एमडीआरटी’साठी ‘क्लॉलिफाय’ होता येते, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये यश मिळाले तर अमेरिकेत मियामीमध्ये मोठा सन्मान केला जातो. त्यासाठी मी काम करत आहे.

माणसे जोडणे, सहकार्याची वृत्ती, जनसंवादने-सुसंवादाने माणसांचे सहकार्य मिळवणे या गुणांनी मला ‘बिझनेस’, ‘फायनान्स’ क्षेत्रात स्थैर्य दिले. सन 2010 मध्ये माझ्यासमोर असंख्य आर्थिक समस्या होत्या. त्या दरम्यान मुलगी 2 वर्षांची असताना माझ्या आयुष्यात मोठ्या आपत्ती आल्यात. त्यातून लहान मुलींसाठी स्वयंसेवी संस्था टाकण्याची प्रेरणा मिळाली. भारती मारुती जगधने फाऊंडेशनची स्थापना केली आहे. त्याची मी संस्थापक अध्यक्ष असून या माध्यमातून मुलींना दत्तक घेऊन त्यांचे आयुष्य घडवायचे आहे. आज कॉर्पोरेट स्तरावरील मोठे अधिकारी, सेवक, शिक्षण, विद्यार्थी यांना प्रेरणादायी व्याख्याने देत आहे. 200 हून व्याख्यानातून मी 20 हजारांहून अधिक लोकांना प्रेरणादायी संदेश दिले आहेत. अनेक देशांमध्ये फायनान्स आणि उद्योजकतेसंबंधी परिसंवाद, चर्चासत्रात भाग घेत विपणन अर्थकारण समजून घेत असते.

अपेक्षा पूर्ण झाल्यानाही तर चिडचिड होते. इतरांकडून अपेक्षा करणे सोडून दिल्यानंतर बर्‍याच वेळा शांतीचा अनुभव येतो. अपेक्षा सोडून स्वीकाहार्यता वाढल्यास समस्या दूर होतात. भुतकाळाला बदलणे हातात नाही, परंतु वर्तमानकाळात पावले उचलून भविष्यकालीन गोष्टींसाठी स्वत:ला तयार करणे म्हणजे जीवनात यशाचे गमक आहे. कैलास चौधरी यांनी मला लाईफ सायन्समध्ये उभे केले. डॉ. मनीष गुप्ता यांनी कौशल्य विकास केला. सुनील चांडक यांनी उद्योजकतेमध्ये आणले इन्सशुरन्स क्षेत्रात विकास करण्यासाठी मला माझ्यातील जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटीने मला इथवर आणले. माझ्या या प्रवासात आईने मला अत्यंत सकारात्मक प्रेरणा दिली. मी अत्यंत ‘ओपन माईंडेड-ट्रान्स्फरन्ट’ आहे. ‘माय लाईफ’ नावाचे आत्मचरित्र्यपर पुस्तक लिहायला घेतले आहे.

लाईफस्टाईल मॅनेजमेंट हा यशस्वीपणाचा महत्त्वाचा भाग आहे. उठल्यावर प्रत्येकानेच दिवसभराच्या कामाच्या नियोजन करावे. नियोजनाशिवाय केलेल्या कुठल्याही कामामुळे गोंधळ, ताण वाढतो. त्यामुळे तुुमचा आनंद हिरावला जातो. मानवी संबंध, समाजसंवाद मानवतावादी दृष्टिकोन, सहकार्याची भावना यामुळे तुमचे आयुष्य उजळून निघतेे आणि या निकषांवरच तुमचे यशाचे गणित अवंलबून आहे. आनंदी राहण्यासाठी इतरांंकडून अपेक्षा ठेऊ नयेत तर स्वत:कडून अधिकाधिक अपेक्षा ठेवाव्यात आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे तरुणाईला सांगेल.

मुलगी, महिला यांच्यातील भरारीला आजही 21 व्या शतकात दाबून टाकण्याचे प्रयत्न केले जातात. परंतु, मुलीला कधीही कमी लेखू नये. जर असे झाले तर ती काय करू शकते, हे इतिहासाने अनेकवेळा दाखवून दिले आहे. ती एक स्त्री आहे म्हणून तिला कमी लेखण्याच्या तिच्या उडणार्‍या पंखांना खाली खेचण्याच्या वृत्तीत बदल झाला पाहिजे. महिलांनी कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक समस्या, आव्हानांमुळे घाबरून जाऊ नका. लढत रहा, परंतु कधीही  ‘गिव्ह-अप’ करू नका. प्रतिकूल परिस्थिती स्वत:ला सावरत मी माझ्या मुलीसह माझ्या आई-वडिलांनाही सांभाळत आहे.

( शब्दांकनः नील कुलकर्णी )

पुढील अंकात – अनंत बोडके

LEAVE A REPLY

*