नाशिक । शोध तंत्रज्ञानाचा ‘दीप’ : जयदीप शाह ( तंत्रज्ञान )

0

‘स्मार्ट सिटी’ साठी स्मार्ट ग्रीड यंत्रणा कशी असावी, याचे सादरीकरण मी केले. इलेकट्रीकल वाहनांचा ‘अविष्कार’ करायचे स्वप्न आहे. तरुण अभियंते, विद्यार्थ्यांना संघटित करून मायक्रो सॅटलाईट लाँच करणे, सामान्य जनतेच्या कुठलेही ‘गॅझेट’ हॅक होऊ नये, यासाठी ‘सायबर सुरक्षा’ प्रणाली तयार करण्याचा मानस आहे.

लेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विषयात डिप्लोमा, डिग्री आणि ‘कन्ट्रोल सिस्टिम’मध्ये मास्टर्स डिग्री पूर्ण केली आणि के. के. वाघ इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये मागील दहा वर्षांपासून सहायक प्राध्यापक म्हणून अध्यापन करत आहे. स्मार्ट सिटीमध्ये माझी रुची अधिक आहे. यासह कल्पना चावला फाऊंडेशच्या माध्यमातून मी मुलांमध्ये अतंराळ खगोलशास्त्राची अभिरुची विकसित करून मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करत आहे. अध्यापनाचे कार्य सुरू झाल्यानंतर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा, शोधपर पेपर सादरीकरण आणि देशभरातील विविध महाविद्यालये, विद्यापीठ येथे होणार्‍या प्रकल्पासाठी पाठवण्याचे काम करत आहे. गेल्या दहा वर्षांत 500 उपक्रमांत भाग घेऊन आमच्या विद्यार्थ्यांनी 300 हून अधिक पारितोषिके मिळवली आहे.

सिमेन्स आयबीएम स्मार्ट सिटीचे काही उपक्रम झाले होते. त्याच्या अभ्यास करून विद्यार्थ्यांना प्रकल्प, शोधप्रबंध आणि पेपरसाठी ‘स्मार्ट सिटी’संदर्भात मार्गदर्शन करत आहेे. रुडकी येथे आमच्या विद्यार्थ्यांनी 2 पारितोषिके मिळवली. त्यानंतर ‘स्मार्ट सिटी’ हा विषय अभ्यासक्रमात असावा असे महाविद्यालयाचे विभागप्रमुख बी. कुशारे आणि प्राचार्यांना वाटले. या प्रयत्नाला यश आले. ‘स्मार्ट ग्रीड’ विषय पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षासाठी शिक्षणक्रमात अंतर्भूत करण्यात आला. त्यानंतर मास्टर्स डिग्रीमध्येही हा विषय अंतर्भूत केला गेला. कुशारे सरांसोबत या कार्यात योगदान देता आले, याचे समाधान वाटते.

अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त ‘स्मार्ट सिटी मॉडेल’ सादरीकरणाची ‘डिव्हीडी’ आम्ही तत्कालिन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे दिली. ‘इनएनटीसी’, केमिकल, इलेक्ट्रिकल, संगणक अभियांत्रिकी विभागाशी चर्चा करून आम्ही अभ्यास केला आणि त्याद्वारे स्मार्ट सिटीसाठी ‘गेमचेंजर’ ठरणारा विद्युत पुरवठा, संगणक प्रणाली, रस्ते वाहतूक, सार्वजनिक वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन यावर उपलब्ध स्त्रोताद्वारे अत्यंत अभ्यासपूर्ण आणि स्मार्ट सिटीसाठी काय करता येईल याचे उपाय दिले. सिमेन्सतर्फे दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत ‘बेस्ट स्मार्ट डिझाईन’साठी सामान्य नागरिकांसाठी श्रेणीत मला यासाठी प्रथम पुरस्कार मिळाला.

सिटीझन ‘सायन्स्टिस’ ही संकल्पना आपल्यामध्ये रुजली तर शहराचे रुप अत्यंत देखणे होईल. स्मार्ट सिटीसाठी नाशिक शहरात काय केले पाहिजे, असे विचारले तर स्मार्ट टॅ्रफिक मॅनेजमेंट सिस्टम, स्मार्ट इलेक्ट्रिकल वाहने, आऊटेज मॅनेजमेंट आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स म्हणजे सर्व स्तरावरील माहिती एकत्र करून त्याचे अध्ययन करून निष्कर्ष, विश्लेषण करून भाकिते तयार करणे म्हणजे ‘डेटा अ‍ॅनालिस्टीक्स’ होय. याद्वारे आपण प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक स्तरावर कुठल्याही घटनेमुळे होणारे कार्यकारण भाव जाणून घेत त्यामुळे होणारे नुकसान किती झाले किंवा होईल याचे भाकित, आखाडेे बांधू शकतो. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील संभाव्य चूक, नुकसान टाळू शकतो. या चार गोष्टींचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये केला जावा, असे मला वाटते.

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानात, संशोधनात मार्गदर्शन करणे, माझ्यासाठी अत्यंत आनंददायी प्रक्रिया आहे. बौद्धिक संपदा (इंटलॅच्युअल प्रॉपर्टी), पेटंट, यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. विजय वैशंपायन या महाविद्यालयातील विद्यार्थ्याने तीन पेटंट फाईल तयार केल्या आहेत. आमचा विद्यार्थी राहुल मन्सुरी याने ‘थ्रीडी प्रिन्टेड प्रॉस्टेथिक नी’ म्हणजे कृत्रिम गुडघा तयार केला असून त्याद्वारे दिव्यांगांना अत्यंत फायदा होणार आहे. या संशोधनास राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाले आहेत. समाजासाठी अशा उपयुक्त संशोधनची गरज आहे. अध्यापनासह ‘कल्पना युथ फाऊंडेशन’च्या माध्यमातून अंतराळ विज्ञान, आकाश निरीक्षण आणि खगोलशास्त्रावरील सुमारे 100 व्याख्याने आम्ही विविध शाळा-महाविद्यालयांत प्रात्यक्षिकांसह दिले असून त्याद्वारे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टी विकसित करत आहोत.

2012 साली कल्पना युथ फाऊंडेशनची नोंदणी करण्यात आली आणि मी त्याचा अध्यक्ष म्हणून कार्य करत आहे. संशोधन, अभिनव उपक्रम आणि तंत्रज्ञान माझी ‘पॅशन’ आहे. मलेशिया येथे जाऊन पेपर सादरीकरण करण्याचे भाग्य मिळाले. जर्मनीमध्ये अनेक नवीन गोष्टी शिकता आल्या. तेथील तरुणाईच्या संकल्पना, अभिनवता याला अत्यंत मोलाचे महत्त्व दिले जाते, तसे आपल्या देशात झाले तर देशाचे चित्र नक्कीच बदलेल. के. के. वाघ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन इलेक्ट्रिकल वाहनांचा ‘आविष्कार’ करायचे स्वप्न आहे. नाशिकचे तरुण अभियंंते, विद्यार्थ्यांना संघटीत करून ‘मायक्रो-सॅटलाईट’(उपग्रह)तयार करून तो अंतराळात शोधणे, सामान्य जनतेच्या कुठलेही ‘गॅझेट’ हॅक होऊ नये, यासाठी ‘सायबर सुरक्षा’ प्रणाली तयार करण्याचे माझे स्वप्न आहे. समाजाला उपयुक्त ठरेल, मानवी जीवन अधिक सुखकर करणारे संंशोधन तंत्रज्ञान विकसित करणार्‍या शास्त्रज्ञांची देशाला आज गरज आहे.

(शब्दांकन – नील कुलकर्णी  )

LEAVE A REPLY

*