Type to search

Breaking News गणेशोत्सव नाशिक मुख्य बातम्या विविधा

पारावरच्या गप्पा : गावातबी इकोफ्रेंडली गणपती बसवायचा … !

Share

(मारुती मंदिरात समदी मंडळी जमलेली )

रंग्या : हे बघा सगळ्यांनी वर्गणी देयाची ..काय?
सम्या : हा..हा ..समद्या घराकडून वर्गणी काढायची.. परतेक वरीस आपल्याला खिशातून पैसे टाकावा लागत्यात…
भग्या : व्हय .. असंच करा औंदा ..न्हायतर एकालाबी आरतीला येऊ द्याच न्हाय.. ?
पाटलाच्या तुक्या : अय…अर गप्प बसा .. काय वर्गणी लावलीरे.. एवढी वर्गणी घेऊन काय करता तुम्ही? म्हण समद्याकडून वर्गणी घेयाची ..
रंग्या : पण तात्या ..पैशाबिगर गणपती कसा बसवायचा ?

पाटलाच्या तुक्या : हा मग ..देव काय म्हणतो .. पैशाचं पाहिजे मला ? अरे प्रत्येकाची परिस्थिती नसती वर्गणी देयाची ? अर मागच्याच आठवड्यात त्या संत्याची आई वारली//मग त्याच्याकडं लगेच पैसे मागायचं .. अरे ते काय परवाचीच गोष्ट दाम्याचा बैल गेला रे… थोडं शहाणं व्हा.. पोराओ…
भग्या : पर तात्या ..औंदा जरा येगळं डेकोरेशन करायचं म्हणत्यात पोरं …
तान्या : व्हय तात्या …. शहरात कसं असतंया ..अगदी तसंच ..त्यामुळं पैसं लागणार हायीत …

पाटलाचा तुक्या : तान्या, भग्या औंदा कामून ऍडमिशन न्हाय घेतलं रं …
तान्या -भग्या : ते काय न्हाय ..आम्हाला शिकायचं नव्हतं ?
पाटलाच्या तुक्या : का पैसं नव्हतं ? अर ही पैशाची उधळपट्टी सोडा आता.. ज्याला जस होईल तशी वर्गणी घेऊ.. पर कुणाला तरास देऊ .. शहरात काय आपल्याला गावातबी शहरापेक्षा चांगलं डेकोरेशन व्हतंया ? काय मंडळी … (समदीजण व्हयं व्हयं करत्यात )
तान्या : ठीक ये तात्या .. पर आमचीबी एक अट हाय ? (समदी आ वासून बघत्यात )
पाटलाच्या तुक्या : आतार कोणती अट ?
तिघबी : आम्ही ठरिवलंय की औंदा आपल्या गावातबी ईकोफेरिएंडली गणपती बसवायचा ?
पाटलाचा तुक्या : अन ते र काय?
रंग्या : अवं तात्या , इकोफ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक गणपती… या गणतीमुळे प्रदूषण व्हनार न्हाय ..                                      पाटलाच्या तुक्या : चालतंय कि… अन अजून एक यावरीश पोलिसांकडून सक्त ताकीद आलिया कि मोठे साउंड लावू नका .. ती काळजी घ्या.. आपल्या इथं म्हातारी माणसं राहत्यात.. मग लागा तयारीला…

( गावात गणपतीचे आगमन )
पाटलाच्या तुक्या : आज गावात गणपती आले, त्यामुळे सगळ्यांनी सायंकाळी प्रसादाला यायचं ह.. बरं आज मंदिरात भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवा . तेव्हा गावकरी येतील. काय पोराओ ..
बाकी मंडळी : व्हय तात्या …आम्ही लहान पोरांसाठी छोट्या स्पर्धांचे आयोजनही केलं आहे… तसेच करमणुकीचे खेळही घेणार आहोत..
घोषणा : आला रे आला, गणपती आला, एक-दोन-तीन चार गणपतीचा जयजयकार, गणपती बाप्पा मोरया. अशा घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!