Type to search

Breaking News देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या

देशदूत संवाद कट्टा : ड्रेनेज, पावसाळी गटार व गावठाणाचे प्रश्‍न गंभीर

Share

नाशिक | प्रतिनिधी
नदीला गेल्या अनेक वर्षांची पूराची समस्याआहे. मात्र यंदाचा पूर हा कमी प्रमाणात पावसाच्या पाण्याचा होता तर जास्त प्रमाणात मनुष्य निर्मित होता. पावसाळी पाणी, गटारींचे पाणी, एकत्रीत यंत्रणांना जोडलेले असून, त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याला वाटच न मिळाल्याने पाणी साचून लोकांचे नुकसान झाले. रस्ते बनवताना त्यांची उंची वाढवत नेल्याने पाणी आपोआपच बाजूला भरु लागले. नदी पात्रात कॉंक्रीट करुन पात्रच वर उचलले गेले. दरवर्षी पावसाचे पाणी शिरुन नुकसान होणे योग्य नसून प्रशासनाने यात लक्ष घालून कायमचा तोडगा काढण्याची गरज असल्याचा सूर देशदूत संवाद कट्यातून उमटला.
दै, देशदूत तर्फे आयोजित करण्यात आलेल्या संवाद कट्टात ‘नाशिकची पूर परिस्थिती आणी व्यवस्थापन’ या विषयावर मान्यवरांनी आपली मते मांडली.                          याचर्चेत गटनेते शाहु खैरे, नगरसेविका वत्सला खैरे, नगरसेविका वैशाली भोसले, नाशिक सराफ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ.वैशाली बालाजीवाले हे होते.
नाशिक शहरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ३५० कोटी रुपयांची पावसाळ गटार योजना उभारण्यात आली. ती पूर्णत: फोल ठरली असल्याचे मान्यवरांनी सांगितले. पूर काळापूरती या विषयावर चर्चा होते. त्यानंतर सर्वच विसरुन जातात. त्यामुळे याबाबत खोलवर विचार करण्याची गरज आहे. नदीत धरारातून येणार्‍या पाण्यासह वाढीव पाणी हे पावसाली गटारीतून व छोट्या नद्या व नाल्यांतून येतअसते.                                          प्रत्यक्षात ७ जून १६ ला धरणातून पाणी सोडले नसतानाही पूर आला होता. कारण पावसाळी गटारी सोबतच नाले चुकिच्या पध्दतीने जोडले गेलेले आहेत. पावसाळी पाणी घारपूरे घाटात सोडलेले असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी ड्रेनेज जोडल्याने पावसाचे पाणी सराफ बाजारात येत असल्याचे सांगितले.
शहराच्या तळाच्या बाजूला सराफ बाजार असल्याने शहर भरातील पाण्याचा भार या बाजारपेठेवर येतो. त्यातून नाल्यांवर केलेले चुकीचे स्लॅबमुळे त्यांच्या क्षमता बदलल्या आहेत. अनेक ठिकाणी सफाई केलेली नसल्याने पाणी बाहेर तूंबून दुकानांमध्ये शिरले.
शहरातील अतिक्रमणांचा प्रश्‍न मोठा आहे. अनेक ठिकाणी नदी पात्रात अतिक्रमणे करुन पाण्याची गती कमी करण्याचा प्रयत्न केला गेल्याने अती दाबाने पाणी शिरले होते.
पूर्वीच्या चुका आपण करु नये. पूराचा धोका सर्वांनाच आहे. तो व्यापार्‍यांसह नागरीकांनाही आहे. या बाबत प्रशासनात जागरुकता आणण्याची गरज आहे. शहर स्मार्ट करताना ड्रेनेज लाईन मोठ्या करण्याचे काम अगोदर करणे गरजेचे आहे.त्यामुळे सराफ बाजाराला सातत्याने पाणी साचण्याचा त्रास होतो.
-वैशाली भोसले
सराफ बाजारात १७२५, १८५४च्या मोठ्या पूराच्या नोंदी आहेत.२०० वर्षात २ पूर तर मागिल १० वर्षात ३ पूर सराफ बाजाराने पाहीले आहे. या पूरांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. या परिसरात ड्रेनेजच्या तूंबण्याने व पावसाळी पाणी वाहून जाण्याची यंत्रणा नसल्याने देखिल मोठे नुकसान होते.
-चेतन राजापूरकर
गंगापूर धरणा व्यतिरिक्त ४ धरणांतून व ५ नद्यांतून पाणी पात्रात येत असते. ब्ल्यू व रेड लाईनचा प्रश्‍न मोठा गंभीर आहे. याबाबत सरकारने निर्णय घेणे गरजेचे आहे. यावेळी बनवण्यात आलेल्या डीपीमध्ये दूप्पट एफएसआय प्रस्तावित केला होता. मात्र शासनाने तो दिड करुन पाठवला. हे योग्य नसून, जुन्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे ब्ल्यू व रेड लाईनचा प्रश्‍न गाभीर्याने विचार कण्याचा आहे.
-शाहु खैरे
ड्रेनेजची क्षमता ही तोकडी आहे. त्यात जादा घाण वाहुन नेली जाते. मनपाने पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठीची यंत्रणा चुकिच्या पध्दतीने गटारीला जोडली गेलेली आहे.ती तपासून त्यांची योग्य क्षमता करावी, पावसाळी गटार व ड्रेनेच यांच्यात बदल ठेवावा व शहराच्या बाहेर त्यांचे पाणी गेले पाहीजे याचे नियोजन करण्याची गरज आहे.
-वत्सला खैरे 

Leave a Comment

error: Content is protected !!