Type to search

Breaking News गणेशोत्सव नाशिक मुख्य बातम्या

देशदूत पर्यावरणपूरक गणेशा २०१९ : बांबूपासून बनवा आकर्षक मखर

Share

नाशिक । प्रतिनिधी
जागृती झाल्याने सुज्ञ नागरिक पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला आता महत्त्व देत आहेत. यासाठी साध्या साध्या गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो, याचे महत्त्व कलाशिक्षक विनोद जांभोरे पटवून दिले असून अनोख्या पद्धतीने बांंबूचा वापर करण्याचे तंत्र दिले आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा पीओपी व इतर रासायनिक पदार्थांनी बनलेल्या मूर्तीमुळे होणार्‍या जलप्रदूषणाबद्दल आता लोकांना माहिती होत आहे. पर्यावरण अनुकूल गणेशमूर्तींची मागणीही दरवर्षी वाढत आहे. पर्यावरणास अनुकूल सामग्री, शाडूमाती, पुठ्ठा आणि इतर पर्यावरण-अनुकूल सामग्रीपासून बनविलेल्या गणेशमूतीर्र्ंना लोक जास्त पसंती देत आहेत.

कलाशिक्षक असणारे विनोद जांभोरे यांनी या गणेशोत्सवासाठी विविध पर्यावरणपूरक कलात्मक सजावटींची माहिती दिली. ते म्हणाले, काही इंचांच्या मूर्तीपासून ते 21 फूट उंचीपर्यंतच्या गणेशमूर्ती स्थापन केल्या जातात. पण आता चित्र थोडे बदलत आहे, लोक आता पीओपीने बनलेल्या मूर्तींपेक्षा, इको-फ्रेन्डली किंवा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निवडत आहेत. त्याचप्रमाणे प्लास्टिक आणि थर्माकोल किंवा पॉलिस्टीरिनच्या सजावटीऐवजी पर्यावरणपूरक अशा सजावटी करू शकतात.

निसर्गाने आपल्याला दिलेले बांबू ही बांधकाम क्षेत्रात सर्वात सुंदर भेट आहे. बांबू जितका लवचिक, तितकाच तो मजबूतदेखील आहे. बांबूच्या सहाय्याने आपण कोणतीही रचना तयार करू शकतो. बांबूपासून बनलेली होडी त्यावर कागदी हिरव्या रंगाचे वेल, पान, विविध रंगांची फुले अशी ही सजावट करू शकतो. त्याचबरोबर वाढत जाणार्‍या उंचीचे बांबू कापून त्याची एक वर्तुळाकार रचना करून त्यात गणेश स्थापना केली जाऊ शकते. लवचिक बांबूपासून आपणास हवे ते आकार देऊन आपण सजावट करून शकतो, असे जांभोरे यांनी सांगितले.

दोरी आणि माती
कॉयर आणि मातीचा उपयोग पर्वत किंवा कोणत्याही कृती आकृतीसारखे विविध आकार तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. आपण आपले आवडते अ‍ॅनिमेटेड कार्टून आकृती साध्या आकार किंवा प्राण्यांच्या आकारांसह बनवण्याचा देखील प्रयत्न करू शकता.

रंगबेरंगी दोरी, कापडी मखर
दोरी आणि कपड्यांना वेगवेगळ्या शैलींमध्ये त्यांना गुंफून चांगले असे डिझाइन तयार केले जाऊ शकते. कापड आणि दोरीने बनलेला शामियाना वा झालर यांची आरस सजवण्यासाठी गोल किंवा चौरस आकारात तयार करता येऊ शकते.

टिंटेड कागदाचा मखर
टिंटेड पेपर हा रंगीबेरंगी आणि सहज विघटन होणारा आहे. या कागदाचा उपयोग गणरायाच्या सजावटीचा मखर तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. एक किंवा अनेक रंगांची रंगसंगती किंवा दोन वेगळ्या रंगांचा एकत्रित वापर करून विविध आकार देऊन सजावट तयार करता येऊ शकते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!