Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

देवळाली : अवघ्या ६३ जागांसाठी २० ते २२ हजार तरुणांची हजेरी; गर्दीमुळे रात्रीच भरती प्रक्रिया सुरु

Share

नाशिक : येथील देवळाली कॅन्टोमेंटमध्ये लष्कराच्या भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांमुळे तुफान गर्दी झाली आहे. अवघ्या ६३ जागांसाठी २० ते २२ हजार विद्यार्थी आल्याने प्रशासनाला रात्री दीड ते दोनच्या सुमारास भरती प्रक्रिया सुरु करावी लागली.

देवळाली येथे ११६ इन्फ्रा पॅरा बटालियनची भरती आज सुरु असून अवघ्या ६३ जागांसाठी हजारो तरुण दाखल झाले आहेत. भरतीस्थळी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी जागा नसल्याने त्यांनी संपूर्ण रात्र रस्त्याच्या कडेला तसेच बसथांब्यावर काढली आहे. रात्री अचानक गर्दी वाढल्यामुळे प्रशासनाने रात्री दीड दोनच्या सुमारास भरतीस प्रारंभ केला. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये चेंगराचेंगरीचा प्रकारही घडला. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीचार्जही केली. या गर्दीमुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. या गर्दीवरून देशातील बेरोजगारीचे चित्र स्पष्ट होते.

ऐन सणासुदीच्या दिवसांत भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. तसेच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी याठिकाणी लष्कराचे जवान, स्थानिक पोलिस, होमगार्ड तैनात करण्यात आले होते. ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासनाकडून ३ अधिकारी आणि ६० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवळालीतील आनंद रोड मैदान ते सह्याद्री नगर जवळील मैदानावर ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!