Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

देवळाली कॅम्प : परतीच्या पावसाने बळीराजा संकटात; द्राक्षांवर डावण्या रोगाचा प्रादुर्भाव

Share

देवळाली कॅम्प : परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या खरीप हंगामातील मालाची वाट लागण्या बरोबर द्राक्ष पिकाची होणारे नुकसान लक्षात घेता यंदाची बळीराजाची दिवाळी अंधारात असल्याची चिन्हे दिसत आहे.

नाशिक तालुक्यातील पूर्व, पश्चिम व दक्षिण भागात मोट्या प्रमाणात द्राक्ष पीक घेतले जाते. आथिर्क सुबत्ता देणारे पीक असल्याने शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही शेती करीत आहेत. मात्र परतीच्या पावसाची पिकाला नजर लागली असून गेल्या पाच महिन्या पासून पडणाऱ्या पावसाने नदी काठावरील तसेच दुष्काळी भागातील द्राक्ष बाग उध्वस्त झाल्या आहेत.

फुलोरा स्थितीत व आगाऊ छाटणी केलेले घड स्थितीतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात जवळपास 100 टक्के खरीपाची पेरणी झालेली आहे. गेल्या 2 वर्षात खरिप वाया गेल्याने यंदा नुकसान भरून निघेल या आशेवर शेतकरी होते. तसेच सोयाबीन, टमाटो,भुईमूग, कडधान्ये, या शिवाय भाजीपाला व नगदी पीके चांगले उत्पादन देऊन जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र या सर्वांवर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे. वापसा मिळत नसल्यामुळे शेतात काम करणे कठीण झाले आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागांमध्ये दावण्या रोगाने थियमान घातले आहे. यावर रोगप्रतिकारक औषधांची फवारणी करून देखील पावसाच्या सरी व दमट वातावरण या मुळे रोग आटोक्यात येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

द्राक्ष, डाळिंब व भाजीपाला या पिकांना वाचविण्यासाठी औषधे व खतांचा मोठा खर्च झाला मात्र तो वाया जात आहे. खते वाहून गेल्याने पिकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली. टमाटो सारखे हमखास पैसे मिळवून देणारे पीक अर्ध्यावर आले. दरवर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये सुरू होणार साखर कारखाने यंदा डिसेंबर महिन्यात सरु केले जाणार आहेत लवकर कारखाने सुरू केल्यास अपेक्षित साखर उतारा मिळणार नाही. परिणामी शेतकरी या पिकाच्या उत्पादनात मागे पडणार आहे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!