खारीफाटा येथे बसच्या धडकेत युवक ठार तर दोघे जखमी

0

भऊर : देवळा-सौंदाणे रस्त्यावर खारीफाटा येथे बस व मोटार सायकल यांच्या अपघातात एक युवक ठार दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. खारीफाटा जवळ देवळ्याहुन सौंदाण्याकडे जाणाऱ्या कळवण आगाराच्या बस ने बस क्र.एम एच ४१ बी.टी.४५२९ सौंदाणे कडून घराकडे परतणाऱ्या महेंद्र उर्फ बजरंग कैलास पवार (वय २१) राकेश सुरेश शिंदे (वय २४),अक्षय बाळू बोरसे (वय २१) व तिघे राहणार मेशी ता.देवळा या दुचाकीस्वारांना धडक दिली.

अपघातात महेंद्र पवार हा युवक जागीच ठार झाला तर राकेश शिंदे व अक्षय बोरसे हे दोन्ही गंभीर जखमी झाले जखमींना उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांपैकी एकाची परिस्थिती गंभीर असून त्यास नंतर नाशिक येथे उपचारार्थ पाठविण्यात आले आहे.

मयत महेंद्र पवार यांचे मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले

LEAVE A REPLY

*