भऊर येथे विटांनी भरलेली ट्रॅक्टर- ट्रॉली पलटली

0

भऊर : देवळा तालुक्यातील भऊर येथील शिवनाल्याजवळ विटांनी भरलेली महिंद्रा कंपनीचा विना नंबर असलेला ट्रॅक्टर – ट्रॉली पलटी झाला. सुदैवाने ट्रॉलीवर बसलेल्या मजुरांनी वेळीच उडी मारल्याने सर्व मजूर सुखरूप बचावले असून एकास किरकोळ दुखापत झाली आहे. दि. १० रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास सदर घटना घडली.

ठेंगोडा येथिल वीट भट्टी येथून विटा भरून कांतीलाल वसंत कापळे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर व ट्रॉली भऊर येथे विटा पोहच करण्यासाठी येत होते. दरम्यान भऊर येथील शिवनाल्याजवल ट्रॉलीच्या बेअरिंगचा आवाज आवाज येत असल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला घेत असताना हा अपघात घडला. रस्त्याच्या कडेला ज्या जागी ट्रॅक्टर घेतले तेथे साईड पट्टी खूपच लहान असल्याचे ट्रॅक्टर चालक मुकेश कापळे याच्या लक्षात आले नाही.

साईटला ट्रॅक्टर घेताच विटांनी भरलेल्या ट्रॉलीच्या वजनाने साईट पट्टी दबली गेली व साधारण १५ फूट खोल असलेल्या शेताच्या गटारीत ट्रॉली उलटली. वेळीच ट्रॉली वरती बसलेल्या तिन्ही मजुरांनी उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला. यात एका मजुराला किरकोळ दुखापत झाली. तर सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास जेसबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर- ट्रॉली काढण्यात आली.

LEAVE A REPLY

*