Type to search

लोहोणेर येथे तडीपार गुन्हेगाराकडून विधवा महिलेचा विनयभंग

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

लोहोणेर येथे तडीपार गुन्हेगाराकडून विधवा महिलेचा विनयभंग

Share

देवळा । प्रतिनिधी : तालुक्यातील लोहणेर येथे ३५ वर्षीय विधवा महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे.गेल्या दोन वर्षापासून लोहनेर गावात अनैसर्गिक कृत्य करून बालकाचा खून तसेच अल्पवयीन मुलीवर बलात्कारासारखा गुन्हा घडल्याची घटना ताजी असताना ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

विनयभंग करणाऱ्या संशयित आरोपीला काही दिवसांपूर्वीच तडीपार करण्यात आले असून त्याने पुन्हा गावात येऊन गंभीर कृत्य केल्याने त्याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील लोहोणेर येथील पीडित महिलेच्या पतीचे एका वर्षापूर्वी निधन झाले असून मुली शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतात. सदर महिला ही घरी एकटीच असते. ही संधी साधून स्वप्निल अशोक निकम उर्फ मिरच्याभय्या हा दिनांक १३ एप्रिल रोजी पीडित महिलेच्या घरी गेला व तीला बाहेर बोलावून शारीरिक सुखाची मागणी केली.

सदर प्रकाराची माहिती महिलेने तिच्या कुटुंबीयांना दिली असता १७ एप्रिल रोजी स्वप्निल मिरच्या विरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर संशयित घटनास्थळा वरून पसार झाला असून पोलीस शोध घेत आहेत.

स्वप्निल निकम हा सराईत गुन्हेगार असून देवळा पोलीस ठाण्यात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्याच्यावर काही दिवसांपूर्वीच तडीपारीची कारवाई झाली आहे. देवळा पोलिसांनी त्याला विसरवाडी जिल्हा नंदुरबार पोलीस स्टेशन हद्दीत सोडले होते. तरीही त्याने तडीपारी आदेशाचा भंग करून दिनांक १३ रोजी पीडित महिलेच्या लोहोनेर येथील घरी येऊन विनयभंगा सारखा गंभीर गुन्हा केला.

त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. सदर संशयितावर कडक कारवाई व्हावी यासाठी ग्रामस्थांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना निवेदन दिले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!