Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

देवळा : वाजगाव येथे वीज पडून म्हैस दगावली

Share

वाजगाव  : देवळा तालुक्यातील वाजगाव येथे आज (दि.६ रोजी) परीतीच्या पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. यावेळी गोठ्यात बांधलेल्या म्हशीवर वीज पडून म्हैस जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

दरम्यान जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. वाजगाव येथील शेतकरी रामचंद्र संतोष गवळी पाऊस चालू असतांना गोठ्यात जनावरांना पाहण्यासाठी गेले असता म्हैशीवर वीज पडून म्हैस दगावल्याचे त्यांच्या लक्षात आले. रामचंद्र यांनी काही दिवसापूर्वीच हि दुभती  म्हैस  खरेदी केली होती. म्म्हहैस दगावल्याने किमान ८५ हजाराचे नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती पोलीस पाटील निशा देवरे यांना देण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी तलाठी कुलदीप नरवाडे व ग्रामविकास अधिकारी जे.व्ही.देवरे यांनी घटनास्थळी जावून प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा  करण्यात आला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!