देवळा तालुक्यात मका पीकाची ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ

0

भऊर (वार्ताहर) : देवळा येथे शासकीय आधारभूत किंमत १७०० रुपये प्रति क्विंटल दराने मका खरेदीसाठी ऑनलाईन बुकिंगचा शुभारंभ शेतकी संघाचे अध्यक्ष चिंतामण आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. विठेवाडी येथील बाळासाहेब गमण निकम हया शेतकऱ्याच्या मका पीकाची ऑनलाईन नोंदणी करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला. आतापर्यंत २६८ शेतकऱ्यांनी मका पीकाची ऑनलाईन नोंदणी केली असल्याची माहिती व्यवस्थापक गोरख आहेर यांनी दिली आहे.

शेतकरी संघाच्या कार्यालयात झालेल्या ह्या कार्यक्रमासाठी देवळा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष चिंतामण आहेर, सहायक निबंधक संजय गीते, जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे, योगेश आहेर, सचिव दौलतराव शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या माध्यमातून देवळा तालुका शेतकरी संघाची उप अभिकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सन २०१८ / १९ खरीप पणन हंगाम आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत प्रति क्विंटल १७०० रुपये दराने शेतकरी संघामार्फत मका खरेदी केला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतिचा स्वच्छ व कोरडा केलेला मका आणावयाचा आहे. हया मक्याची आर्द्ता १४ टके विहीत करण्यात आलेली आहे. ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी शेतकऱ्यांनी मका पीकाची नोंद असलेला सातबारा उतारा, आधार क्रमांक, बँक पासबुक झेरॉक्स, मोबाईल क्र, इत्यादी शेतकरी संघाच्या कार्यालयात जमा करून नोंदणी करून घ्यावी व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकरी संघाचे अध्यक्ष चिंतामण आहेर यांनी केले आहे.

यावेळी शेतकरी संघाचे उपाध्यक्ष संजय गायकवाड, अतुल आहेर, अमोल आहेर, बापू आहेर, महेंद्र आहेर,डॉ. राजेंद्र ब्राम्हणकर, साहेबराव सोनजे, सुनिल देवरे आदी संचालक व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*