Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

वाजगाव : कमी पाऊसात वनराई बंधाऱ्याची मदत

Share

देवळा : नाशिक जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस पडल्याने नद्या नाले तुडुंब भरून वाहत असतांना देवळा तालुका मात्र अपवाद ठरला असून वरून राज्याने पाठ फिरवल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.

पाऊस कमी असल्याने शेतकरी वर्गात सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. दमदार पावसाची प्रतिक्षा सर्वांना असतांना रविवारी व सोमवारी (दि.४-५) पहाटे तालुक्यात सर्वत्र हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.
श्रावण प्रारंभ झाला पण अद्यापही तालुक्यात दमदार पाऊस नाही. देवळा तालुक्यात सर्वत्र दमदार पावसाची आजही सर्वजण प्रतिक्षा करीत आहेत.

गेली सहा ते सात दिवसापासून सुरु असलेली रिमझिम पाऊसाच्या सरी पडल्याने ते पाणी शेतातील पाणी जमिनीत मुरते पण डोंगराचे पाणी नाल्याद्वारे वाहून जाते. नाल्यांचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा येणाऱ्या काळात शिवारातील शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होईल म्हणून, देवळा तालुक्यात वाजगाव येथील शेतकऱ्यांनी नाल्यांने वाहणारे पाऊसाचे पाणी वनराई बंधारा बांधून अडवण्याचे काम केले आहे.

वाजगाव येथील शिवशी शिवारातील शेतकरी अशोक महाले, बापू देवरे,विजय आहेर, शिवाजी आहेर, राजेंद्र महाले, गोरख बच्छाव आदि शेतकऱ्यांनी प्लास्टिकच्या गोण्या मातीने भरून गोण्यानी वनराई बंधारा बांधून पाणी अडवण्याचे काम केले आहे. अश्याप्रकारे वाहून जाणारे पाणी सर्वानीच अडवल्याने येणाऱ्या काळात आपल्याला पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. शिवारातही पाण्याची कमतरता जाणवणार नाही. कमी पाऊसात वनराई बंधाऱ्याची मदत मिळणार अशी शिवारासह गावात चर्चा जोर धरत आहे.

तालुक्यात खरीपाची पिके पेरणी करून बराच कालावधी गेला पण पाणी नसल्याने दुबार पेरणीचे सावट दिसत होते. गेल्या काही कमी पाऊसात वनराई बंधाऱ्याची मदत दिवसापासून सुरु असलेल्या रिमझिम पाऊसाने पीकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात किरकोळ वगळता सर्वच धरणे, नाले, पाझर तलाव, के.टी.वेअर आदि कोरडे आहेत. आजही तालुकावासीयांना दमदार पाऊसाची प्रतीक्षा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!