Video : शिवकालीन शस्रांचे प्रात्यक्षिके सादर करून राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन

0

नाशिक : शहरातील संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी चित्तथरारक कसरतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

छत्रपती शिवराय आणि छ्त्रपति संभाजी महाराज यांच्यासारखे पुत्र घडवून स्वराज्य निर्माण केले अशा आदर्श माता राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात संभाजी ब्रिगेड तर्फे व्याख्यान, पोवाडे, शोभायात्रा यासह विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात जिल्हाभर साजरी करण्यात आली.

दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या तरुणांनी चित्तथरारक प्रात्यक्षिक करत अभिवादन केले.शिवकालीन मर्दानी खेळ आखाडयाचे आनंद ठाकुर, राहुल भोईर मर्दानी खेळ प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांचे पारणे फेडले.

यावेळी शिवव्याख्याते नितिन डांगे पाटील यांनी राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिवराय व शंभू राजे यांना स्वता युद्धकला शिकवित स्वराज्य निर्माण केले. प्रसंगी जोखिम स्विकारून शत्रुचा निपात निर्माण करण्याचे धाडस निर्माण केले. त्यामुळे जिजाऊ चरित्र घरोघरी पारायण प्रमाणे वाचली गेलीत तर सुयोग्य संस्कार मुलांवर होतील, जिजाऊ गर्भातच मारली गेली असती तर शिवराय निर्माण झाले नसते म्हणुन स्रीभ्रूण हत्या करू नका असा संकल्प करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमानंतर जिल्हाभरातून संभाजी ब्रिगेड पदाधिकारी व कार्यकर्ते जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथे रवाना झाले.

याप्रसंगी माजी महापौर विनायक पांडे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष डॉ स्वप्निल इंगळे, महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ, जिल्हा सचिव नितिन रोठे पाटील, शिवव्याख्याते नितिन डांगे पाटील, राजेंद्र देसाई, विजय ठाकरे, विठ्ठल काळे, विक्रम गायधनी, शशिकांत कटारे, निलेश कुसमोडे, दर्शन बोरस्ते, विकी ढोले, राकेश भागवत, हर्षल पवार, भूषण काळे, प्रशांत खैरे, स्वप्नील दशमुखे, विनायक चव्हाण, शिवा चौधरी, सागर भदाणे, जितू चव्हाण, मयूर पठाडे, शिवा चव्हाण, राहुल बच्छाव, ललित निरभवणे, प्रथमेश मुळे, प्रथमेश पाटील, गणेश सहाणे, शुभम भावसार, हरीश गायके, अभि चिपाडे, राहुल यमगर, पवन बावस्कर, विशाल आहिरराव, संविधान गायकवाड, राहुल लोखंडे, मुकेश पगारे, निलेश ईंगले, पिंटू दळे, संदीप कानदे, युवराज पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*