सराफ व्यावसायिकांच्या न्यायासाठी ना. भूजबळांना साकडे

नाशिक : महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाद्वारे सराफ बाजारातील सुमारे दोनशे व्यापार्‍याला जाचक नोटीस बजावण्यात आल्या असून याबाबत न्याय मिळावा या मागणीसाठी व्यापार्‍यांद्वारे ना. छगन भूजबळ यांना निवेदन देण्यात आले.

सराफ बाजारातील व्यापार्‍यांना मनपा प्रशासनाने विना परवानगी दुकानाच्या आतील बांधकाम केल्याप्रकरणी १५ हजारापर्यंत दंडाची आकारणी करण्याच्या नोटीस बजावण्यात आलेल्या असल्याचे सराफ व्यवसायीकांच्या वतीने कृष्णा नागरे व नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी ना. भूजबळाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच जाचक अटी असून तातडीने थांबविण्याची मागणी करण्यात आली.

ना.भुजबळ यांनी आलेली नोटीस पाहुन हा व्यापार्‍यांवर अन्याय होत असल्याने महानगरपालिकेच्या आयुक्त व अधिकार्‍यांची दूरध्वनीवर संवाद साधत या नोटीसांना स्थगिती देण्याची सूचना केली. केवळ अनधिकृत कामावर कारवाई करावी असे आदेश दिले.

यावेळी सराफ व्यावसायिक कृष्णा नागरे,सचिन साकुळकर, लकी नागरे, राजेंद्र शहाणे, श्याम रत्नपारखी, अजय उदावंत, आडगावकर बंधू, मयूर शहाणे, मनोज साकुळकर, योगेश मैंद आदींसह व्यापारी उपस्थित होते