मनमाड शहर व्यापारी संघातर्फे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

0

मनमाड (प्रतिनिधी) : मोकाट जनावरांच्या हल्ल्यात एका निरपराध व्यापाऱ्यांचा बळी गेल्यानंतर मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून आज मनमाड शहर व्यापारी संघातर्फे मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. आठ दिवसात मोकाट जनावरांची समस्या मार्गी न लागल्यास आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीख,सचिव राजकमल पांडे यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर व पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मनमाड शहर परिसरात शेकडो मोकाट जनावरे असून आठवडे बाजार,डेली भाजी मार्केट,बाजार समितीचे आवर, दत्त मंदिर रोड यासह शहरातील प्रत्येक गल्ली बोळात ही जनावरे फिरत असतात. काही जनावरे तर मुख्य रस्त्यावर ठाण मांडून बसतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी देखील होते.

अनेक वेळा दोन बैलांची मुख्य बाजार पेठेत, रस्त्यावर झुंज होते. ही झुंज तासंतास चालते ही जनावरे एकमेकांवर धावून येतात त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पोटी पळापळ होते. जनावरांच्या पळापळीत धडक बसल्यामुळे काही जण जखमी देखील झाले आहे. गेल्या आठवड्यात मोकाट जनावरांच्या हल्ल्यात रस्त्याने जाणाऱ्या एका व्यापाऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे. यामुळे मोकाट जनावरे धोकादायक झाली असून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी सुरेश लोढा,रईस फारुकी,गुरूंदीपसिंग कांत,चोथ मुरारी यांच्यासह इतर व्यापारी उपस्थित होते

दरम्यान पालिका प्रशासने मोकाट जनावरे पकडून त्यांना पांजरपोळ मध्ये पाठविण्यास सुरुवात केली होती. मात्र शहरातील काही समाज सेवकांनी याला आक्षेप घेवून वेगवेगळे आरोप केल्यामुळे ही मोहीम थांबविण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेणकर यांनी व्यापाऱ्यांना देऊन ही मोहीम पुन्हा सुरु करण्यात येईल असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

*