Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक-दिल्ली विमानसेवेचा लवकरच ‘श्रीगणेशा’; इंडिगो देणार दररोज सेवा

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक-दिल्ली विमानसेवेसाठीं इंडीगोकडून प्रस्ताव देण्यात आला असून, केंद्रिय नागरी उड्डाण मंत्र्यांनी त्या प्रस्तावास अनुकूल भूमिका दर्शिवली आहे. लवकरच नाशिकची बंद पडलेली दिल्ली विमान सेवा पुन्हा एकदा उड्डाण करणार आहे. त्यामुळे नियमित नाशिक दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावर आहे.

नाशिक-हिंदण-नाशिक सेवा देण्यासाठी पूढाकार घेतानाच इंडीगो विमान कंपनीने नाशिक-दिल्ली विमानसेवा सूरू करण्यासाठी इच्छा उड्डयन मंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. यासाठी इंडीगोने निश्चित केलेल्या वेळेच्या स्लॉटची मागणी मंत्रालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, खा.हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून एअर इंडीया, इंडीगा व स्पाईक जेट या विमान कंपन्यांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न चालवलेला होता. खा. गोडसेंच्या पूढाकाराने नुकतीच इंडिगो विमान कंपनीद्वारे नाशिक-दिल्ली सेवा सूरू करण्याच्या उद्देशाने केंद्रिय नागरी उड्डाण मंत्र्यांसमवेत बैठक घेण्यात आली. यात त्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने ही सेवा लवकरच सूरू होण्याची शक्यता बळावली आहे.

जेट एअरवेज आर्थिक अडगळीत अडकल्यानंतर बंद पडलेली विमानसेवा पुन्हा एकदा सुरु होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, जेटकडून देण्यात आलेल्या सेवा प्रचंड प्रतिसादात सुरु होती. त्यामुळे आगामी नाशिक दिल्ली विमानसेवेला प्रतिसाद चांगलाच मिळेल अशी आशाही व्यक्त केली जात आहे.

नाशिक दिल्ली विमानसेवेसाठी  इंडीगोने आपल्या पत्रात दिलेल्या कार्यक्रमानुसार दररोज दिल्ली (दुपारी 12.12) निघून नाशिक (14.10) 25 सप्टेंबर पासून प्रारंभ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच नाशिकहुन परतीसाठीं (14.45) ला निघून दिल्ली (16.35)ला पोहोचणार आहे. ही सेवा दररोज देण्याचे प्रस्तावात म्हंटले आहे. हा प्रस्ताव मान्य झाला तर नाशिक दिल्ली विमानसेवा दररोजसाठी खुली होणार आहे.

प्रयत्नाला यश

बंद पडलेली नाशिक-दिल्ली विमान सेवा सूरू करावी यासाठीं केंद्रिय नागरी उड्डाण मंत्र्यांशी चर्चा केली त्यांनी ही सेवा सूरू करण्याबाबत अनुकूल भूमिका व्यक्त केल्यामुळे लवकरच नाशिककरांसाठी ही सेवा सूरू होईल.

हेमंत गोडसे, खासदार नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!