Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

२७ ऑक्टोबरला नाशिकहून राजधानी दिल्लीसाठी ‘उड्डाण’; दररोज मिळणार सेवा

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक-दिल्ली विमानसेवेसाठीं इंडीगोने पुढाकार घेतला असून येत्या २७ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरु होणार आहे. विशेष म्हणजे आठवड्यातून सर्व दिवस ही सेवा देण्यात येणार असून यामुळे नियमित नाशिक दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गेल्या आठवड्यात इंडिगोकडून याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयास प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानंतर केंद्रिय नागरी उड्डाण मंत्र्यांनी या प्रस्तावास अनुकूल भूमिका दर्शिवली असून तत्काळ इंडिगोकडून सेवा देण्याबाबतची माहिती एका अहवालात नागरी उड्डयन मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

जेट एअरवेज आर्थिक अडगळीत अडकल्यानंतर प्रचंड प्रतिसादात सुरु असलेली नाशिक दिल्ली आणि दिल्ली नाशिक विमानसेवा बंद पडली होती. यामुळे दररोज नाशिक दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तीन ते चार तासांचा प्रवास करून दिल्लीसाठी उड्डाण घ्यावे लागत होते.

नाशिक-हिंदण-नाशिक सेवा देण्यासाठी पूढाकार घेतानाच इंडीगो विमान कंपनीने नाशिक-दिल्ली विमानसेवा सूरू करण्यासाठी इच्छा उड्डयन मंत्र्यांकडे व्यक्त केली होती. त्यानंतर इंडीगोने निश्चित केलेल्या वेळेच्या स्लॉटची मागणी मंत्रालयाकडे निवेदनाद्वारे केली. त्यासही परवानगी मिळाल्यामुळे इंडिगोकडून आगामी सुरु होणाऱ्या विमानसेवा जाहीर करण्यात आल्या आहेत.

देवळाली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून एअर इंडीया, इंडीगा व स्पाईक जेट या विमान कंपन्यांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न चालवलेला होता. खा. गोडसेंच्या पूढाकाराने नुकतीच इंडिगो विमान कंपनीद्वारे नाशिक-दिल्ली सेवा सूरू करण्याच्या उद्देशाने केंद्रिय नागरी उड्डाण मंत्र्यांसमवेत बैठक घेण्यात आली. यात त्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने ही सेवा लवकरच सुरु होणार आहे.

असे असेल वेळापत्रक 

दररोज दिल्लीहून दुपारी दीड वाजता विमान नाशिकच्या दिशेने झेप घेईल. तर नाशिकहून दुसरे विमान दुपारी दोनच्या सुमारास दिल्लीकडे उड्डाण करेल या अहवालात सांगण्यात आले आहे. यातील वेळा बदल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!