Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

उपनगर : कॉन्स्टेबल भरतीला आलेल्या उमेदवाराचा मृत्यू

Share

नाशिक : नेहरूनगर येथे आयोजित स्टाफ सिलेक्शनच्या भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणीत उतरलेल्या एका उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राहुल पद्माकर चव्हाण (वय-२७, रा. जहांगिरपुर, मोकोडी, बुलढाणा) असे या उमेदवाराचे नाव आहे.

(दि. ०७) रोजी राहुल हा नेहरूनगर येथील सीआयएसएफच्या मैदानावर आयोजित भरतीसाठी मैदानी चाचणी देत होता. याचवेळी तो खाली पडल्याने अत्यवस्थ झाला.

यानंतर सीआयएसएफच्या आणि राहुलचा मावसभाऊ योगेश भालेराव यांनी रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!