Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

प्राध्यापक भरतीसाठी 10 नोव्हेंबरची मुदत : यूजीसी

Share

नाशिक । महाविद्यालये आणि विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) उच्च शिक्षण संस्थांना 6 महिन्यांची मुदत दिली होती. मात्र, उच्च शिक्षण संस्थांच्या प्रतिसादाअभावी ही भरतीप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता रिक्त जागांची माहिती भरण्यासाठी पुन्हा 10 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

देशभरात प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याने त्याचा शैक्षणिक कामकाजावर परिणाम होऊन गुणवत्ता ढासळत असल्याचेही निरीक्षण विविध अहवालांतून मांडण्यात आले. त्यामुळे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात येऊन रिक्त जागांची माहिती ऑनलाइन भरण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर या प्रक्रियेत अनेकदा खंड पडल्याने अनेक उच्च शिक्षण संस्थांकडून प्राध्यापकांच्या रिक्त जागांचा तपशील ऑनलाइन भरण्यात आला नसल्याचे स्पष्ट झाले.

ही माहिती विनाखंड भरली जावी; यासाठी यूजीसीने स्मरणपत्रेही पाठवली. त्यानंतरही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले. अखेर या प्रकरणामध्ये आयोगाने लक्ष घातले. यूजीसीने पुन्हा उच्च शिक्षण संस्थांना प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मुदत दिली आहे.

11 हजार जागा रिक्त
राज्यातील विद्यापीठे, संलग्न महाविद्यालये, शासकीय, अशासकीय अनुदानित व खासगी संस्थांमध्ये प्राध्यापकांच्या सुमारे 11 हजार जागा रिक्त आहेत. त्या जागा भरण्यात याव्यात, यासाठी प्राध्यापक संघटनांनी आंदोलन केले होते. आता यूजीसीने उच्च शिक्षण संस्थांना रिक्त जागांची माहिती भरण्यासाठी 10 नोव्हेंबरची मुदत दिली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!