Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मृत्यूच्या वाढत्या इमारती…

Share

नाशिक | गोकुळ पवार

पावसाळा सुरु झाला कि राज्यातील अनेक धोकादायक इमारती, जुने वाड्याची समस्या निर्माण होते. अशावेळी अचानक एखादी कोसळून दुर्घटना घडते आणि या दुर्घटनेत अनेक जण नाहक बळी पडतात. पावसाळा सुरु झाल्यापासून मुंबई, पुणे, नाशिक शहरात इमारत कोसळून अपघात झाल्याच्या घटना घडला आहेत. घटना झाल्यानंतर दोन दिवस ही घटना उचलून धरली जाते. परंतु पुन्हा मोडकळीस आलेल्या आणि असुरक्षित इमारतींचा, वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो.

साधारण पावसाळाला सुरवात होण्यापूर्वी किंवा सुरु झाल्यावर राज्यातील प्रशासन धोकादायक इमारतींचा, वाड्यांचा आढावा घेत असते. काही तज्ज्ञांच्या मते हिवाळ्याच्या अखेरीस या कामांना सुरवात करणे आवश्यक असते. कारण पुढे जाऊन दिलेल्या मुदतीत जुन्या इमारती पाडता येतात. तसेच येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास वेळ मिळतो. यासाठी काही ठराविक कालावधीत तीस वर्षांपेक्षा अधिक जीर्ण असलेल्या वाड्याचे तसेच इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावं असे सांगितले जाते. स्थानिक प्रशासनाने देखील याकामी वेळीच स्थानिक नागरिकांना सावधगिरी बाळगण्यासाठी सांगत असते. परंतु हे सगळं होताना दर पावसाळ्यात भिंत, इमारती कोसळून होणार्‍या मृत्यूंचं तांडव पाहिलं, तर खरंच स्ट्रक्चरल ऑडिट होत का, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करतात.

दिवसेंदिवस लोकसंख्या वाढ झपाट्याने होताना दिसून येत आहे. परिणामाची जागेचा अभाव, फ्लॅस्ट्सच्या वाढणाऱ्या किमती, मध्यमवर्गीयांचा अट्टाहास, मजल्यावर मजले, त्यात होणारा भ्रष्टाचार या गोष्टी वाढताना दिसतात. सध्याच्या घडीला जागतिकीकरणाच्या नावाखाली शहरामंध्ये वाढणारी सिमेंटची जंगले अधिकच पसरताना दिसत आहे. मुंबईसारख्या ठिकाणी भराव टाकून इमारती उभारल्या जात आहेत. परिणामी पूर परिस्थिती निर्माण होतेय. कुठे भिंत, कुठे इमारत कोसळण्याच्या घटना वारंवार होत आहेत. फ्लॅस्ट्सच्या किमती वाढल्या असल्या तरी सुरक्षेची हमी नागरिकांना मिळत नाही. वाढत्या मृत्यूच्या इमारती सुरक्षेची हमी कधी देणार असा सवाल नागरिक करताना दिसत आहे.

नागरिकांचे सहकार्य आवश्यक
पावसाळा सुरु होण्यापूर्वी प्रशासन धोकादायक इमारत तसेच वाड्या संदर्भात परिपत्रक काढून रहिवाशांना सतर्क करीत असते. काहीवेळा नागरिक ऐकत नाहीत, तेथील जागा सोडण्यास सर्वसामान्य तयार नसतात. अशावेळी नागरिकांचे सहकार्य प्रशासनास अपेक्षित असते.
-रमेश वाघमारे, प्रमुख आपत्ती व्यवस्थापन

बघ्यांची भूमिका अयोग्य
अशी घटना घडल्यानंतर अनेकजण बघ्यांची भूमिका घेत असतात. अशावेळी पीडितांना मदत करणे आवश्यक ठरते. कारण अनेकदा वेळेवर मदत न मिळ्यावर अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. प्रशासनाने देखील अशा घटना होऊच नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी प्रशासन आणि नागरिक यामध्ये समन्वय घडून आला पाहिजे.
-वंदना पाटील, नागरिक

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!